घरमुंबईकंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयाची BMC अधिकाऱ्यांकडून पाहणी

कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयाची BMC अधिकाऱ्यांकडून पाहणी

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा होत असतानाच आता मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंगना रनौतच्या पाली हिली परिसरातील कार्यालयाची पाहणी केली. पालिकेच्या नियमानुसार हे कार्यालय बांधलेले आहे का, याचा आढावा या कर्मचाऱ्यांनी केली. आज, सोमवारी तीन अधिकारी आणि तीन कर्मचारी असलेले सहा जणांचे पथक पाली हिलमधील कंगनाच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी या संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली.

कंगनाच्या कार्यालयाला लागून असलेल्या इतर बंगल्यांचीही त्यांनी यावेळी पाहणी केली. एकूणच या मार्गावर बांधकाम रस्त्यावर आले आहे का? इतर गोष्टी बेकायदेशीर आहेत का? बांधकामाबाबत काही त्रुटी आहेत का? याचा आढावा पालिकेच्या पथकाने घेतला. काही ठिकाणी त्यांनी रस्त्याची मापेही घेतली आहेत. यावेळी कंगनाच्या कार्यालयाच्या रंगरंगोटीचे काम सध्या सुरु आहे. हे काम करणाऱ्या पाच कामगारांचीही या पथकाने किरकोळ चौकशी केली.

- Advertisement -

काय म्हणाले अधिकारी 

एच/ पश्चिम विभाग कार्यलयातील इमारत प्रस्ताव विभागाचे कार्यकारी अभियंता भाग्यवंत लाटे यांच्यासह चार जणांच्या पथकाने भेट दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही तिथे कोणतेही कारवाई केली नाही.सर्व्हे आणि मोजमाप केले आहे. आणखी काही बंगल्याची पाहाणी केली. बंगल्याअंतर्गत काही स्ट्रकचरल बदल केले आहेत का ते तपासायचे होते. आज केवळ तपासणी केली असून मंजूर आराखडा आणि प्रत्यक्ष बांधकाम यातील वाढीव बांधकाम बाबत त्यांना नोटीस पाठवून अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाऊ शकते. मात्र, सध्या कंगना रनौत यांना कोणतीही नोटीस बजावलेली नाही.आम्ही आमचा रिपोर्ट इमारत प्रस्ताव विभागाला देऊ, पुढे ते ठरवतील, असेही ते म्हणाले आहेत.

कंगनाने मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत भीती वाटत असेल तर तिने मुंबईत येऊ नये, असं म्हटलं होतं. कंगनाने ती ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहे, कोणात हिंम्मत असेल तर अडवून दाखवा, असा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी कंगनाला ‘वाय’ सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. कंगनाने वाय सुरक्षा दिल्याबद्दल अमित शहा यांचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

मुख्यमंत्र्यांनंतर शरद पवारांना देखील आला धमकीचा फोन!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -