घरमुंबईमध्य, ट्रान्स हार्बर लोकलसेवा विस्कळीत

मध्य, ट्रान्स हार्बर लोकलसेवा विस्कळीत

Subscribe

मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रबाळे रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने दोन्ही रेल्वेमार्गावरील वाहतुक सेवा काही काळ ठप्प झाली.

परतीच्या पावसामुळे आज सकाळी मुंबईकरांची तारांबळ उडाली. अशातच मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रबाळे रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने दोन्ही रेल्वेमार्गावरील वाहतुक सेवा काही काळ ठप्प झाली.

माटुंगा रेल्वेस्थानकात सिग्नल बिघाड

शुक्रवारी सकाळी सकाळी ६ च्या सुमारास मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानकाजवळील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे मध्य रेल्वेवरील डाऊन जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. या दरम्यान जलद डाऊन मार्गावरील काही लोकल धीम्या मार्गावरून वळवण्यात येत आहेत. दरम्यान, बिघाड दुरूस्त करण्याचे काम मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात आले आहे.

- Advertisement -

ठाणे-वाशी अप-डाऊन उशीराने सुरु

ठाणे-वाशी ट्रान्सहार्बर मार्गावर रबाळे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतुक सेवा ठप्प झाली होती. लोकलसेवेवर परिणाम झाल्याने ठाणे-वाशी मार्गावरील लोकलसेवा १५ ते २० मिनीटं उशीराने सुर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -