घरमुंबईविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापुरातील राष्ट्रवादीत फेरबदल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापुरातील राष्ट्रवादीत फेरबदल

Subscribe

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने बदलापूर शहरात पक्ष संघटनेत बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे गटनेते आशिष दामले यांची बदलापूर शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मावळते शहराध्यक्ष कालिदास देशमुख यांनी प्रदेश चिटणीस पदी वर्णी लावण्यात आली आहे. देशमुख-दामले गटातील संघर्ष टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात होत आहे.

बदलापूर शहर आणि आसपासच्या भागात पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद होती. मुरबाडचे विद्यमान आमदार किसन कथोरे हे राष्ट्रवादीतून आमदार होते. मात्र कथोरे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या अर्ध्याहून अधिक नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. तर काहींनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या सन 2015 च्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे अवघे दोन नगरसेवक निवडून आले. त्यामुळे राष्ट्रवादीची अवस्था बिकट झाली. अशा परिस्थितीत शहरात राष्ट्रवादीचा जनाधार वाढणे आवश्यक होते. अर्थात त्यादृष्टीने प्रयत्न होताना दिसतही होते. परंतु या प्रयत्नांना गटबाजीची किनारही होती.

- Advertisement -

आशिष दामले यांचा गट व कालिदास देशमुख यांचा गट यामध्ये सातत्याने शीतयुद्ध सुरु असून त्याचा पक्ष संघटनेला फटका बसत असल्याच्या भावना कार्यकर्ते व्यक्त करीत होते. पक्षाच्या जेष्ठ नेत्यांसमोरही ही गटबाजी दिसून आली होती. कालिदास देशमुख यांचा शहराध्यक्ष पदाचा पहिला कार्यकाळ पूर्ण झाल्यावरही शहराध्यक्ष पदावरूनही देशमुख-दामले गटामध्ये रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा होती. त्यानंतर पुन्हा कालिदास देशमुख यांना शहराध्यक्ष पदी संधी देण्यात आली होती.मात्र आता विधानसभा निवडणुक तोंडावर येऊन ठेपली असताना राष्ट्रवादीने शहराध्यक्ष पदी आशिष दामले यांना संधी दिली आहे. तर कालिदास देशमुख यांना प्रमोशन देत त्यांची प्रदेश चिटणीस पदी वर्णी लावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -