बोगस प्रमाणपत्राच्या आधारे बनवल्या कम्पोस्टेबल प्लास्टिक बॅग

सीबीसीबीमार्फत १२ कंपन्यांवर कारवाई

Mumbai
कम्पोस्टेबल प्लास्टिक बॅग

भारतीय बाजारपेठेत कम्पोस्टेबल प्लास्टिक बॅग विक्रीसाठीचा बनावट प्रमाणपत्राचा वापर करणार्‍या देशभरातील १२ कंपन्यांविरोधात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा(सीपीसीबी)ने कारवाईचा बडगा उगारला आहे. खोटे प्रमाणपत्र सादर करणार्‍या कंपन्यांमध्ये मुंबईतील एका कंपनीचाही समावेश आहे. बनावट प्रमाणपत्राचा वापर करून कम्पोस्टेबल प्लॅस्टिक बॅग विक्री करण्याचे प्रकार या कंपन्यांकडून झाले आहे. मुंबई महापालिकेनेही या १२ कंपन्यांची यादी जाहीर केली आहे.

मुंबईतील मेसर्स एडव्हान्स बायो मटेरिअल कंपनी लिमिटेडचा समावेश बनावट प्रमाणपत्र बाळगणार्‍या कंपन्यांमध्ये आहे. या कंपन्यांद्वारे अनसर्टिफाईड कम्पोस्टेबल कॅरिबॅग भारतीय बाजारपेठेत विक्री करण्यात येत होती. बारा कंपन्यांद्वारे बनावट प्रमाणपत्राचा वापर झाल्याचे सीपीसीबीच्या निदर्शनास आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट नियमावली २०१६ चा भंग या कंपन्यांनी केला आहे. सीपीसीबीने याआधीच अधिकृत कम्पोस्टेबल प्लॅस्टिक बॅग निर्मात्यांची आणि विक्रेत्यांची यादी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे.

परराज्यांतील कंपन्यांचाही सामावेश
या बनावट कंपन्यांवर पर्यावरण सुरक्षा कायदा १९८६ नुसार कारवाई होणार असल्याचे सीपीसीबीने स्पष्ट केले आहे. तसेच २० जानेवारीपूर्वी कृती अहवाल सादर करण्याचे आदेशही सीपीसीबीकडून देण्यात आले आहेत. मुंबईतील मेसर्स एडव्हान्स बायो मटेरिअल कंपनीसह इतर अकरा कंपन्यांमध्ये अहमदाबाद, उत्तर प्रदेश, चेन्नई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई याठिकाणच्या कंपन्यांचा समावेश आहे.

तर परवानाही रद्द होणार
प्लॅस्टिक बंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या आदेशान्वये परवाना रद्द करण्याची कारवाई होणार आहे. प्लॅस्टिक बंदी प्रभावीपणे राबविण्यासाठी मुंबई महापालिकेच्या १२५ सदस्यांच्या ब्ल्यू स्क्वॉडच्या रोजच्या टार्गेटमध्येही वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत १०० मॅन्युफॅक्चरींग युनिट्सवर पालिकेने आतापर्यंत कारवाई केली आहे. प्लॅस्टिक बंदी लागू झाल्यापासून जून ते डिसेंबर या कालावधीत ४ लाख भेटी या स्क्वॉडने दिल्या आहेत. तसेच ४७,१६३ किलो प्लॅस्टिक जप्त करून १.९९ कोटी रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. महिन्यापोटीच्या ३५०० भेटींचे टार्गेट येत्या काळात आणखी वाढवण्याचा महापालिकेचे नव उदिष्ट आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here