घरमुंबईशीव रुग्णालयाच्या इमारतींच्या बांधकामामध्ये १३४ झाडांचे बळी

शीव रुग्णालयाच्या इमारतींच्या बांधकामामध्ये १३४ झाडांचे बळी

Subscribe

पर्यावरणप्रेमींच्या विरोधानंतरही झाडे कापण्यावर प्रशासन ठाम

मुंबई महापालिकेच्या शीव रुग्णालय अर्थात लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयाच्या संलग्न तीन इमारती बांधण्याच्या कामाला नियमबाह्य परवानगी दिल्यानंतर आता या इमारतींच्या बाधंकामात तब्ब्ल १३४ झाडांचे बळी घेतले जाणार आहे. येथील पाच इमारतींच्या बांधकामांमध्ये ६१ झाडे कापली जाणार आहेत, तर ७३ झाडे पुनर्रोपित केली जाणार आहे. विशेष म्हणजे बाधित होणारी ही सर्व झाडे आंबा,नारळ,जांभूळ,फणस,उंबर आदी झाडांचा समावेश आहे. रुग्णालयाच्या बांधकामातच ही झाडे कापून पर्यावरणाचा र्‍हास केला जात असल्याने पर्यावरणप्रेमींकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुंबई महापालिकेच्या एफ/उत्तर विभागातील भाउु दाजी लाड रोडवरील डॉक्टर्स वसाहतीच्या पुनर्वसाहतीसाठी एक इमारत, विक्रीकरता दोन इमारती, महापालिका भाडेकरुंचेे पुनर्वसनासाठी तसेच झोपडपट्टी पुनर्वसनासाठी दोन इमारती अशाप्रकारे एकूण पाच इमारतींचे बांधकाम शीव रुग्णालयाशी संलग्न केले जात आहे. या पाच इमारतींच्या बांधकामांसाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी सुमारे पावणे सातशे कोटी रुपये खर्च केले जाणार असून हा प्रस्ताव स्थायी समितीत नियमबाह्य मंजूर करण्यात आला आहे. महापालिकेच्या तत्कालिन अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांनी या प्रस्तावाच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला हेाता. त्यानंतर आयुक्तांनीही यावर स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांच्या स्वाक्षरी विना विभागाच्या प्रमुख अभियंत्यांच्या स्वाक्षरीने हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. या निविदेतील कंत्राट किंमतीबाबत तांत्रिक चुका लक्षा आणून दर कमी करण्याची आवश्यकता असताना प्रशासनाने वाटाघाटी करण्यापूर्वीच या प्रस्तावाला मंजुरी मिळवून घेतली. त्यानंतर महापालिका सभागृहातही या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

- Advertisement -

त्यामुळे याबाबतच्या नियमबाह्य प्रस्तावाला मंजुरी दिल्यांनतर, आता या बांधकामांमध्ये आड येणारी झाडे तोडण्यासाठी तसेच पुनर्रोपण करण्यासाठी वृक्ष प्राधिकरणापुढे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.या पाचही इमारतींच्या बांधकामाच्या ठिकाणी एकूण ३४० झाडे आहेत. परंतु त्यातील १३४ झाडे ही या बांधकामांमध्ये बाधित होत आहे. त्यामुळे इमारतींच्या बांधकामांमध्ये येणार्‍या या झाडांपैकी ६१ झाडे कापण्यास तसेच ७३ झाडांचे पुनर्रोपण करून उर्वरीत २०६ झाडे आहे त्याच ठिकाणी ठेवण्यास परवानगी मागणारा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या सभेपुढे मंजुरीसाठी आला आहे. त्यामुळे एकाबाजुला काँग्रेस झाडे कापण्याच्या विरोधात उभे असतानाच त्यांच्याच पक्षाच्या सदस्या सुषमा राय यांनी या जागेची पाहणी करून तेथील झाडे कापण्यास सहमती दर्शवली आहे.

त्यानुसार ही झाडे कापणे आणि पुनर्रोपित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला आहे. मागील वृक्षप्राधिकरणाच्या सभेत सत्ताधारी पक्षाने पुनर्रोपित झाडे कुठे केली जाणार आहे,अशी विचारणा केली होती. परंतु त्यावर उद्यान विभागाने समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे त्यांनी एक प्रस्ताव दप्तरी दाखल केला होता. त्यामुळे या रुग्णालय इमारतींच्या बांधकामांमध्ये तब्बल ७३ झाडे पुनर्रोपित केली जाणार असल्याने ही झाडांच्या पुनर्रोपणाच्या नावाखाली हा प्रस्ताव फेटाळून पुन्हा दप्तरी दाखल केला जाणार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेची तसेच काँग्रेस पक्षाची भूमिका काय राहते तसेच भाजप काय भुमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- Advertisement -

पर्यावरणप्रेमी डॉ. सिमा खोत यांनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. आपण या बांधकामांमध्ये कापल्या जाणार्‍या झाडांबाबत आक्षेप नोंदवला होता. परंतु प्रशासनाकडून त्यावर समाधानकारक उत्तर देण्यात आले नव्हते. झाडे कुठे पुनर्रोपित केली जाणार आहे, याची माहितीही प्रशासनाकडे नाही. त्यामुळे झाडे कापून आधीच आजारपणांमध्ये भर पाडली जाते, मग त्याठिकाणी पुन्हा रुग्णालय बाधले जाणे चुकीचे आहे. रुग्णालयाच्या बांधकामासाठी झाडे कापणे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -