घरCORONA UPDATECorona : उपमुख्यमंत्री अजितदादा ब्रीच कँडीत तर फडणवीस सरकारी हॉस्पिटलमध्ये

Corona : उपमुख्यमंत्री अजितदादा ब्रीच कँडीत तर फडणवीस सरकारी हॉस्पिटलमध्ये

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाच्या काळात फर क्वचितच बाहेर फिरल्याचे दिसले. पंरतू राज्याचा चेहरा म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरूवातीपासूनच अनेक दौरे केले. अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आजच समोर आली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अजित पवार यांना उपचारासाठी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही वारंवार राज्यभर दौरे केले असून कोरोना तसेच नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी फिरल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी त्यांनाही कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र त्यांनी सेंट जॉर्ज या सरकारी हॉस्पिटमध्ये दाखल होणे पसंत केले. यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी मला कोरोना झाल्यास सरकारी हॉस्पिटलमध्येच उपचारासाठी दाखल करा, असे म्हटले होते.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस 

देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले. लॉकडाऊनच्या काळात देवेंद्र फडणवीस राज्यभरात कोविड हॉस्पिटल्समध्ये जाऊन पाहणी करत होते. त्यामुळे त्यांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असताना त्यांनी गिरीश महाजन यांना फोन करून मला कोविड झाला तर मुंबईत सरकारी हॉस्पिटल्समध्ये भरती करा, खासगी रुग्णालयात दाखल करू नका, अशी सूचना त्यांनी केली होती. त्यानुसारच त्यांना सरकारी हॉस्पिटल्समध्ये दाखल करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा –

अभिनेत्री पायल घोष आज रामदास आठवलेंच्या पक्षात प्रवेश करणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -