Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन अभिनेत्री पायल घोष आज रामदास आठवलेंच्या पक्षात प्रवेश करणार

अभिनेत्री पायल घोष आज रामदास आठवलेंच्या पक्षात प्रवेश करणार

Subscribe

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोपी करणारी अभिनेत्री पायल घोष आता राजकारणात प्रवेश करत आहे. पायल घोष आज, सोमवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपाईमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच पायल घोष हिने अनुराग कश्यप यांच्यावर खळबळजनक आरोप केल्याने ती चर्चेत आली होती. तिच्या आरोपांमुळे बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी समन्स बजावत कश्यप यांची ८ तास चौकशीदेखील केली होती. या प्रकरणानंतर बॉलिवूडमध्ये दोन गट तयार झाल्याचे देखील पाहायला मिळाले होते.

दरम्यान, पायल आता राजकारणात उडी घेत असून तिच्या महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनुराग कश्यप यांच्यावर आरोप लावल्यानंतर पायल घोषला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता पायल रिपाईत पक्षात प्रवेश करणार आहे. पायलसोबत तिचे वकील देखील याच पक्षात प्रवेश करणार आहेत. पायलकडे महिला मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी येऊ शकते अशी चर्चा आहे.

हेही वाचा –

- Advertisement -

भारताचा Recovery Rate चकीत करणारा; आतापर्यंत ७० लाख रुग्णांची कोरोनावर मात

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -