घरCORONA UPDATEधक्कादायक! अखेर मुंबई लोकलमध्येही कोरोनाचा शिरकाव

धक्कादायक! अखेर मुंबई लोकलमध्येही कोरोनाचा शिरकाव

Subscribe

८७० रेल्वे कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

पोलीस आणि बेस्ट पाठोपाठ रेल्वेतही आता कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी राज्य सरकारच्या आग्रहानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेनी १५ जूनपासून लोकल सेवा सुरु केली. त्यामुळे रेल्वेचे तिकीट तपासनीस, वर्कशॉप आणि कारशेडमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना कर्तव्यावर येत असल्याने रेल्वेत कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आतापर्यंत रेल्वेच्या बाबू जगजीवन राम रुग्णालयात कोरोना सदृश लक्षण असलेल्या आणि कोरोनाबाधित अशा १ हजार २४२ रुग्णांना दाखल करण्यात आले होते. ज्यामध्ये मध्य रेल्वेच्या ६७५ आणि पश्चिम रेल्वेवरील ४४० कर्मचार्‍यांचा समावेश आहे. उर्वरित मुंबई महानगर क्षेत्रातील नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये ८७० रेल्वे कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. त्यात आता १ जूनपासून रेल्वेच्या विशेष सेवा सुरु झाल्याने तसेच १५ जून पासून राज्य सरकारच्या आग्रहानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मंत्रालय, पालिका कर्मचारी, पोलिस, शासकीय आणि खासगी रुग्णालयातील कर्मचार्‍यांसाठी लोकल सेवा सुरु झाली आहे. तसेच सोमवारपासून बँक कर्मचारी, वीज कंपन्या, न्यायालय कर्मचारी, बीपीटी, स्टॉक एक्सचेंजसह इतर कर्मचार्‍यांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचार्‍यांना कामावर बोलविण्यात आले आहे. तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वेने वर्कशॉप आणि कारशेडमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना कर्तव्यावर येत आहे. मात्र आता रेल्वे कर्मचार्‍यांना सुद्धा कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचार्‍यांमध्ये सुद्धा भीतीचे वातवरण निर्माण झाले आहेत.

- Advertisement -

अशी आहे आकडेवारी

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई सेंट्रलच्या बाबू जगजीवन राम रुग्णालय आतापर्यंत १ हजार २४२ जणांना दाखल करण्यात आले होते. ज्यामध्ये मध्य रेल्वेच्या ६७५ आणि पश्चिम रेल्वेवरील ४४० रुग्णांचा समावेश आहे. तर उर्वरित मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ८७० कोरोनाग्रस्तामध्ये रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुबिंयातील सद्स्य तसेच निवृत्त रेल्वे कर्मचारी आहे. जेव्हा उपनगरीय लोकल सेवा सुरूच होताच, त्यांच्या परिणाम रेल्वे कर्मचार्‍यांच्या आरोग्यावर होत असल्याचा आरोपही यापुर्वी रेल्वे कर्मचारी संघटनाकडून करण्यात आलेला होता. त्यामुळे तिकीट खिडक्यांवरील बुकिंग क्लार्कना कोरोनाची बाधा होण्याच्या घटनांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेकडून तातडीने प्रवासी आरक्षण केंद्राच्या ३५ शिफ्ट कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

रेल्वे समोर आता आव्हान

भारतीय रेल्वेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रुग्णालय आणि मुंबईत जगजीवन राम रुग्णालय दोन्ही महत्त्वाची रेल्वे रुग्णालये आहे. जनजीवन राम रुग्णालयात ३५० आणि भायखळा रुग्णालयात ३६० खाटांची सुविधा आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करताना त्याची लागण अन्य रुग्णांना होऊ नये, यासाठी मुंबई सेंट्रल असलेल्या पश्चिम रेल्वेचे जगजीवन राम रुग्णालयात फक्त कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी देण्यात आले आहे. या कठीण परिस्थितीत जगजीवन राम रुग्णालयाततील रूग्ण आणि आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करणार्‍या कर्मचाऱ्यांची काळजी विशेष काळजी घेतली जात आहे. मात्र कोरोनाचे अशा पद्धतीने रुग्ण वाढल्यास रेल्वे समोर सुद्धा आता मोठे आव्हान आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -