घरमुंबईदख्खनच्या राणीला सुद्धा लागणार ‘व्हिस्टाडोम’ कोच

दख्खनच्या राणीला सुद्धा लागणार ‘व्हिस्टाडोम’ कोच

Subscribe

मध्य रेल्वेचा रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव

कोकण मार्गावरील जनशताब्दी एक्स्प्रेसला निसर्गाचे मनमुराद दर्शन घडविणारे ‘व्हिस्टाडोम’ कोच बसविण्यात आले होते. या कोचला पर्यटकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने डेक्कन एक्स्प्रेस, पंचवटी आणि मांडवी एक्स्प्रेसलाही व्हिस्टाडोम कोच लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भारतीय रेल्वेची महाराणी असलेल्या दख्खनच्या राणीला व्हिस्टाडोम कोचच्या यादीपासून दूर ठेवण्यात आले होते. या संबंधीचे वृत्त दैनिक ‘आपलं महानगर’ने प्रकशित केल्यानंतर मध्य रेल्वेने दख्खनच्या राणीलाही व्हिस्टाडोम कोच जोडण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे मागणी केली आहे.

नुकतेच जनशताब्दी एक्स्प्रेसला ‘व्हिस्टाडोम’ कोच बसविण्यात आले होते. याला मिळाला प्रतिसाद बघून मध्य रेल्वेने डेक्कन एक्स्प्रेस, पंचवटी आणि मांडवी एक्स्प्रेसलाही व्हिस्टाडोम कोच बसवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ‘डायनिंग कार’ असलेली भारतातील ही एकमेव प्रवासी ट्रेन दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन मागील गेली ८९ वर्षे खंडाळ्याच्या घाटातून मुंबई ते पुणे धावते, मात्र या डेक्कन क्वीन ट्रेनला या व्हिस्टाडोम कोचपासून वंचित ठेवण्यात आले होते. इतकेच नव्हे तर या ट्रेनला व्हिस्टाडोम कोच जोडण्याची मागणी खूप दिवसांपासून प्रवासी संघटनांकडून करण्यात आली होती. मात्र, या मागणीकडे मध्य रेल्वेचे दुर्लक्ष होत होते. यासंबंधी प्रवाशांनीही नाराजी व्यक्त केली होती. दैनिक ‘आपलं महानगर’ने यावर वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर मध्य रेल्वेने याची दखल घेत भारतीय रेल्वेची महाराणी असलेल्या दख्खनच्या राणीला व्हिस्टाडोम कोच जोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे डेक्कन, मांडवी, पंचवटी, कोकणकन्या या मेल, एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच जोडण्याच्या निर्णयावर आता शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

नेरळ-माथेरान विस्टाडोम कोचमुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या खात्यात भर पडली आहे. मुंबई ते मडगाव चालविण्यात येणार्‍या कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच जोडल्यास प्रवाशांना निसर्गाचे सौंदर्य पाहता येणार आहे. मुंबई ते पुणे जाणार्‍या डेक्कन एक्स्प्रेसमधून सह्याद्रीच्या रांगेने दर्शन घडणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -