घरमुंबईलता मंगेशकर हॉस्पिटलमधून परतल्या; चाहत्यांचे मानले आभार

लता मंगेशकर हॉस्पिटलमधून परतल्या; चाहत्यांचे मानले आभार

Subscribe

भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांच्यावर तब्बल 28 दिवसांचे उपचार केल्यानंतर रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. घरी परतल्यानंतर लता मंगशेकर यांनी ट्विटरवरुन चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत. 12 नोव्हेंबर रोजी लता मंगेशकर यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की, नमस्कार. मागच्या 28 दिवसांपासून मी ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होते. मला न्युमोनिया झाला होता. माझी प्रकृती पुर्ण बरी झाल्यानंतरच मला घरी सोडले जावे, असे डॉक्टरांचे मत होते. आता मी पुर्णपणे बरी झालेली आहे. आई-वडीलांचा आशीर्वाद आणि चाहत्यांचे प्रेम, प्रार्थना यामुळेच मी बरी झाले. मी तुम्हा सर्वांची मनापासून आभारी आहे. लता मंगेशकर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अफवांचे पेव फुटले होते.

मात्र त्यांनी ट्विटरवरुन आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. त्यानंतर अनेक त्यांच्या आरोग्याबाबत काळजी व्यक्त करत त्यांची प्रकृती लवकर ठिक होण्यासाठी प्रार्थना केली होती. मंगेशकर यांनी आपल्या इंग्रजी ट्विटमध्ये त्यांनी त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांचे आभार व्यक्त केले आहेत. डॉ. प्रतीत समदानी, डॉ. अश्विन मेहता, डॉ. जरीर उद्वाडिया, डॉ. निशित शाह, डॉ. जनार्दन निबोंळकर आणि डॉ. राजीव शर्मा यांचे त्यांनी विशेष आभार मानले आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -