घरमुंबईडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त कडेकोट बंदोबस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त कडेकोट बंदोबस

Subscribe

कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतल्याचा दावा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दादर येथील शिवाजी पार्क, चैत्यभूमीसह इतर ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्ताची योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याचा दावा यावेळी पोलिसांकडून करण्यात आला आहे. शुक्रवार 6 डिसेंबरला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 63 वा महापरिनिर्वाणदिन असून त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्र तसेच देशभरात विविध त्यांचे अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर येतात.

यावेळी दादर परिसरात प्रचंड गर्दी उसळत असल्याने तिथे तसेच शहरात इतर ठिकाणी कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सुरक्षितेच्या दृष्टीने 40 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस ठाण्यासह सशस्त्र पोलीस दल, राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बीडीडीएस, विशेष शाखा, गुन्हे शाखा, मुंबई पोलीस वाहतूक विभाग तसेच 500 हून अधिक होमगार्ड असा बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे दादरच्या चैत्यभूमी तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी सीसीटिव्हीद्वारे निगराणी ठेवण्यात आली आहे. परिसरात साध्या वेशातील पोलीस गस्त घालणार आहेत. दादर चौपाटीवर पोलीस नौकाद्वारे सतर्क गस्त घालणार आहे.

- Advertisement -

मुंबई वाहतूक विभागाकडून रहदारी योग्यरीत्या नियंत्रित केली जाणार असून वाहतूकीचे नियम तोडणार्‍या व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची समस्या असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी मुंबई पोलिसांच्या 100 क्रमांकासह ट्विटर तसेच 7738133133 आणि 7738144144 या एसएमएसद्वारे पोलिसांशी संपर्क साधावा, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच जवळच असलेल्या पोलिसांशी संपर्क साधून त्याची शहानिशा करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -