निवडणूक कार्यालयातील अधिकार्‍याचा हृदयविकाराने मृत्यू

निवडणुक कार्यालयातील अधिकार्‍याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

Mumbai
mba student dies of cardiac arrest during ramp walk practice in bengaluru

विक्रोळी मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयातील एका अधिकार्‍याचा सोमवारी दुपारी १ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राहुल जगताप, असे मृत्यू झालेल्या अधिकार्‍याचे नाव आहे.

नेमके काय घडले?

राहुल जगताप हे सोमवारी नियमितपणे निवडणूक कामासाठी कार्यालयात हजर झाले होते. ठरलेल्या कामानुसार ते सकाळपासून इव्हिएम मशीनचे काम करत होते. मात्र, दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांच्या पाठीत अचानक दुखायला लागले. निवडणुकीच्या कामात पाठ दुखीचा त्रास अधिक नको म्हणून निवडणूक अधिकारी अजित नैराळे यांनी जगताप यांना हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले. तसेच त्यांच्यासोबत एका व्यक्तीला पाठवत त्यांना विक्रोळीतील टागोर नगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू केली. या तपासणी दरम्यान, दुपारी १ वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले, मात्र, त्यांच्या उपचाराला यश आले नाही.

बेलापूरला राहणारे राहुल जगताप हे सरकारच्या इआरटीएल विभागात कार्यरत असून, त्यांची झोनल ऑफिसर म्हणून विक्रोळी मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयात नियुक्ती झाली होती.


हेही वाचा – नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपीची हत्या; बहिणीच्या आत्महत्येचा घेतला बदला