घरमुंबईअकरावीचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित; ७ महिन्यापासून विद्यार्थी शिक्षणापासून दूर

अकरावीचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित; ७ महिन्यापासून विद्यार्थी शिक्षणापासून दूर

Subscribe

अकरावीचे पहिले सत्र संपले तरी यंदा प्रवेशप्रक्रियाच सुरू न झाल्याने शिक्षक, विद्यार्थी, पालक संभ्रमात आहेत.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत ऑनलाइन शिक्षणावर भर दिला. मात्र अकरावी प्रवेशाची प्रक्रिया रखडल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. अकरावीचे पहिले सत्र संपले तरी यंदा प्रवेशप्रक्रियाच सुरू न झाल्याने शिक्षक, विद्यार्थी, पालक संभ्रमात आहेत.

लॉकडाउनमुळे दहावीचा निकाल यंदा उशिरा जाहीर झाला. यानंतर प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली. अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीचे प्रवेश पूर्ण झाल्यावर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने अकरावी प्रवेशालाही ब्रेक लागला. अकरावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबाबत कोणताही विचार शिक्षण विभागाने केलेला नाही. त्यामुळे अकरावीचे विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावीच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. या परीक्षेनंतर पुन्हा बारावीच्या वर्षाला सामोरे जावे लागणार असल्याने विद्यार्थी, पालक चिंतेत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणामुळे रखडलेली अकरावी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया कधी सुरू होणार असा प्रश्न विद्यार्थी, पालकांसह प्राध्यापक व प्राचार्यांना पडला आहे.

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेद्वारे एसईबीसी आरक्षणानुसार राज्यभर ४,१९९ विद्यार्थ्यांचेच प्रवेश झाले आहेत. तर आतापर्यत ७८,६१० विद्यार्थ्यांनीच अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेतला असून अद्याप हजारो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. शिक्षक संघटनांनी याविषयी शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतरही ठोस निर्णय घेण्यात येत नसल्याने संघटनांकडून शिक्षण विभागाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
अकरावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाने कोणतेही नियोजन केलेले नाही. अकरावीत प्रवेश झाला नसल्याने विद्यार्थी तणावात आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने युद्धपातळीवर विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी नियोजन करावे.
– सुभाष मोरे – कार्यवाह, शिक्षक भारती संघटना
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -