मोठा विमान अपघात टळला; इथोपियन एअरलाइन्सच्या विमानाचं मुंबई विमानतळावर इमरजन्सी लँडिंग

emergency landing of an aircraft with some technical glitch on mumbai airport

मुंबई विमानतळावर थोपियन एअरलाइन्सच्या मालवाहू विमानाचे इमरजन्सी लँडिंग करण्यात आल्याने मोठा अपघात टळला आहे. विमानातील हायड्रोलिक सीस्टिममध्ये बिघाड झाल्यामुळे या विमानाचे मुंबई विमानतळावर इमरजन्सी लँडिंग करण्यात आले. मुंबईच्या अग्निशमन विभागाला माहिती मिळताच अग्निशमनच्या तीन गाड्या, एक मदत वाहन तसेच इतर आवश्यक वाहने घटनास्थळी तैनात करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, हे मालवाहू विमान रियादहून बंगळुरुला जात होते. मात्र, विमानात हायड्रोलिक गळती होत असल्याचे वैमामनिकाच्या निदर्शनास आलं. त्यानं प्रसंगावधान राखत वैमानिकानं मुंबई एअरपोर्टवर विमानाचे सुरक्षित इमरजन्सी लॅडिंग करण्यात आले.

विमानाच्या समोरच्या चाकातून मोठ्या प्रमाणात तेलगळती होत असल्याने विमान तातडीने मुंबईकडे वळविण्यात आले. आपत्कालिन स्थितीत मुंबई विमानतळावर विमान उतरवण्यात आले. दुर्घटनेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई विमानतळ येथे तातडीने तीन बंब, दोन बचाव वाहने व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. मात्र वैमानिक तसेच सहा सदस्यांसह विमान सुखरुप खाली उतरविण्यात आले असून स्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले.