घरमुंबईपाणथळ जागेवरील अतिक्रमणांविरोधात उपोषण

पाणथळ जागेवरील अतिक्रमणांविरोधात उपोषण

Subscribe

वसई तालुक्यातील अनेक पाणथळ जमिनींवर अतिक्रमण करून त्याठिकाणची तिवरांची झाडे तोडून बेकायदा बांधकामे करण्यात आलेली आहेत. मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याचे निर्देेश देऊनही काहीच कारवाई झालेली नाही. त्याच्या निषेधार्थ पर्यावरण संवर्धन समितीच्यावतीने आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.

समितीचे समन्वयक समीर वर्तक, मेकॅन्झी डाबरे आणि मॅक्सवेल रोझ आमरण उपोषणात सहभागी झाले असून वसईच्या तहसील कचेरीसमोर सोमवारपासून आंदोलन सुरु करण्यात आले आहे. हरित वसईचे प्रणेते, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आंदोनलस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला.

- Advertisement -

भुईगाव येथील खारटनातील तिवरांची तोड करुन पाणथळ जागेत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत कोळंबी प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर याठिकाणी भराव करून बेकायदा बांधकामे आणि चाळी बांधण्यात आल्या आहेत. याप्रकरणी वनशक्ती संस्थेने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावेळी वसईच्या प्रांतांनी याठिकाणी तिवरांची तोड करून पाणथळ जागेत अनधिकृत कोळंबी प्रकल्प, बांधकाम व चाळी उभारल्याचे हायकोर्टात मान्य केले होते. त्यानंतर हायकोर्टाने 25 जुलै 2016 रोजी यायाचिकेवर निर्णय देताना सदर कोळंबी प्रकल्प, बांधकाम व चाळी निष्कासित करून पाणथळ जागेचे संवर्धन करण्याचे आदेश दिले होते.

याप्रकरणी कोणतीही कारवाई न झाल्याने पर्यावरण संवर्धन समितीने बेमुदत उपोषण सुुरू केल्यावर महापालिकेच्या वतीने प्रांताधिकार्‍यांनी संबंधितांना 2 मार्च 2019 रोजी नोटीसा बजावल्या होत्या. पण, नोटीसा बजावण्याखेरीज बांधकामे जमीनदोस्त करण्याची अथवा संबंधितांवर हायकोर्टाच्या निर्देशानुसार गुन्हे दाखल करण्याची कोणतीच कारवाई न झाल्याने बेमुदत उपोषण सुुरु केल्याची माहिती समीर वर्तक यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -