निर्माल्यापासून तयार करणार खत; डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

निर्माल्यापासून तयार करण्याच्या या उपक्रमासाठी १० हजार स्वयंसेवक प्रतिष्ठान मार्फत तैनात

Mumbai

आज राज्यभरात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. सकाळपासूनच गिरगाव चौपाटी येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. घरगुती बाप्पांचा मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच विसर्जन होत आहे. त्यामुळे दुपारनंतर जी गर्दी आहे त्यात वाढ होताना दिसत आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात हजारो किलो निर्माल्य निर्माण होणार आहे. मात्र यानंतर महापालिकेला पडणारा प्रश्न म्हणजे जमा होणाऱ्या फुलांच्या निर्माल्याची कशा पद्धतीने विल्हेवाट लावायची.

मात्र यावेळी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान प्रशासनाच्या मदतीला धावून आले आहे. या जमा होणाऱ्या निर्माल्यापासून प्रतिष्ठान गांडूळ खत निर्मित करणार आहे. या उपक्रमासाठी १० हजार स्वयंसेवक प्रतिष्ठान मार्फत तैनात करण्यात आले आहे. हे स्वयंसेवक या निर्माल्य जमा करण्याचे आणि फुल आणि दोरा वेगळा करण्याचे काम करत आहे.


हेही वाचा-  विघ्न टळले; शेषनागावर विराजमान ‘परळचा राजा’ उंचीमुळे पुलाखाली अडकला

गेल्यावर्षीही प्रतिष्ठान मार्फ़त संजय गांधी नॅशनल पार्क येथे हा उपक्रम राबवण्यात आला होता. यंदाही त्यांनी गिरगाव आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हा उपक्रम राबवला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here