अंबरनाथ मोरिवली येथे भीषण आग

अंबरानाथ येथील मोरिवली एमआयडीसी परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर लोकलची वाहतूक काही काळ खोळबंली आहे.

Mumbai
Ambernath fire
अंबरनाथ मोरिवली येथे लागलेली भीषण आग

अंबरनाथ येथील मोरिवली गावात आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मोरिवली गावात असलेल्या एमआयडीसी विभागात एका कंपनीमध्ये ही आग लागली. दुपारच्या वेळी स्पोट झाल्यामुळे ही आग लागली. मोरिवली एमआयडीसी येथे लागलेल्या आगीमुळे सीएसएमटीच्या दिशेनं येणाऱ्या गाड्या थांबविण्यात आल्या होत्या. सध्या आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. येथील प्रेशिया केमिकल कंपनीला ही भीषण आग लागली. या आगीत तीन जण जखमी झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here