घरमुंबईफ्लॅटचे आमिष दाखवून 48 जणांना पावणेतीन कोटींना गंडा

फ्लॅटचे आमिष दाखवून 48 जणांना पावणेतीन कोटींना गंडा

Subscribe

गोवंडीतील घटना; चार भामट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

गोवंडीतील महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये फ्लॅटचे आमिष दाखवून 48 जणांना चारजणांच्या एका टोळीने सुमारे पावणेतीन कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार गोवंडी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चारही भामट्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी फसवणुकीसह अन्य भादंवि कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक झाली नसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रदीप भगवान कदम हे मानखुर्द येथील शीव-पनवेल महामार्गावरील डॉ. आंबेडकर नगर, दुर्गामाता चाळीत राहतात. डिसेंबर 2016 रोजी त्यांची संबंधित चारही आरोपींशी ओळख झाली होती. या आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना गोवंडीतील बैंगणवाडी, महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये फ्लॅटचे आमिष दाखविले होते. त्यांच्या या आमिषाला बळी पडून त्यांनी, त्यांना काही रक्कम दिली होती. त्यानंतर त्यांना फ्लॅटचे बोगस दस्तावेज देण्यात आले होते. मात्र, दस्तावेज मिळाल्यानंतरही त्यांना फ्लॅटचा ताबा मिळाला नाही.

- Advertisement -

याचदरम्यान त्यांना या चारही भामट्यांनी अशाचप्रकारे 47 जणांना फ्लॅटचे आमिष दाखवून त्यांच्याकडून काही रक्कम घेतल्याचे समजले. डिसेंबर 2016 ते नोव्हेंबर 2017 या कालावधीत त्यांनी 48 जणांकडून फ्लॅटच्या नावाने सुमारे पावणेतीन कोटी रुपये घेतले होते, या सर्वांना फ्लॅट मिळाल्याचे बोगस दस्तावेज दिले. मात्र, कोणालाही फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच प्रदीप कदम यांनी शिवाजीनगर पोलिसांत चारही आरोपीविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -