घरमुंबईमुंबईचा हाजी अली दर्गा 'कचऱ्याच्या' विळख्यात!

मुंबईचा हाजी अली दर्गा ‘कचऱ्याच्या’ विळख्यात!

Subscribe

पुण्यातील विद्यार्थी मुंबईतील हाजीअली दर्गावर गेले असता त्यांनी हाजी अली परीसरात प्लास्टिकचा खच असल्याचे पाहिले. समुद्रात कचरा टाकल्यानंतर तो बाहेर येणारच हे माहित असून देखील समुद्रात कचरा टाकला जातो

मुंबईत गेल्या आठवड्यात कोसळलेल्या पावसाने दाणादाण उडवली. समुद्र खवळून निघाला. समुद्रातल्या मोठ्या लाटांनी मुंबईकरांनी टाकलेला सगळा कचरा बाहेर फेकून दिला. १२ हजार टन कचऱ्याचा ढिग मुंबईच्या किनाऱ्यावर पसरला. विशेषतः मरीन ड्राईव्ह, हाजी अली, दादर चौपाटी, जुहू बीचवर प्लास्टिकचे ढिग साचले. हाजी अली दर्गा तर प्लास्टिकच्या विळख्यात सापडला. त्यामुळे आता समुद्र प्रदुषणाकडे मुंबईकरांना लक्ष देण्याची गरज आहे त्यामुळे द नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला समुद्र प्रदूषणाकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

कचरा समुद्रात फेकल्यामुळे प्रदूषण

समुद्रात राजरोसपणे कचरा टाकला जातो. भरतीच्या वेळी हा सगळा कचरा समुद्र फेकून देतो. आणि किनारे घाणेरडे होतात. हाजी अली सारख्या धार्मिक ठिकाणी देखील कचरा टाकला जातो. यात प्लास्टिक सर्वाधिक असल्याचा दावा पुण्यातील आय एल एस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केला. हाजी अली दर्ग्याची दूरवस्था पाहता याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे या विद्यार्थ्यांनी म्हटले.

- Advertisement -
पाहा- प्लास्टिकनं व्यापलेला जुहूचा किनारा

नेमकं काय पाहिलं विद्यार्थ्यांनी ?

पुण्यातील विद्यार्थी मुंबईतील हाजीअली दर्गावर गेले असता त्यांनी हाजी अली परीसरात प्लास्टिकचा खच असल्याचे पाहिले. समुद्रात कचरा टाकल्यानंतर तो बाहेर येणारच हे माहित असून देखील समुद्रात कचरा टाकला जातो. विशेष म्हणजे या ठिकाणी सांडपाणी देखील सोडण्यात येत असल्याचे विद्यार्थ्यांनी पाहिले. त्यामुळे समुद्रातील पाण्यातून दुर्गंधी येते. हे पाणी आणि हा कचरा समुद्री जीव आणि माणसांना देखील हानीकारक आहे. हाजीअलीसारख्या धार्मिक परीसरात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा नाही, त्यामुळे हे येत्या काळात घातक ठरु शकेल, असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे आता प्रदुषण मंडळांना याचा अधिक अभ्यास करायला सांगितला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -