घरमुंबईप्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या सन्मानपत्राचा मान ठाण्याला

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या सन्मानपत्राचा मान ठाण्याला

Subscribe

मुरबाडच्या शेतकर्‍याने स्वीकारले प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपत्र

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किसान सन्मान निधी योजनेचा प्रारंभ रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश गोरखपूर येथून केला. यावेळी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील अल्याणी गावचे गौतम चिंतामण पवार यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते सन्मानपत्र स्वीकारले. महाराष्ट्रातून या कार्यक्रमासाठी निवड झालेले हे एकमेव शेतकरी आहेत. या योजनेंतर्गत देशातील १२ कोटी गरीब शेतकर्‍यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत तीन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत २ कोटी शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे.

या योजनेचा जिल्हास्तरीय समारंभ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे , जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, कृषी विकास अधिकारी प्रफुल्ल बनसोडे, एम. सावंत, तहसीलदार राज तवटे यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी लाभार्थी 13 शेतकर्‍यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

- Advertisement -

शेतकर्‍यांचा विश्वास वाढतोय
शेतकरी कर्जमाफी, किसान सन्मान निधी, सॉईल कार्ड, पीक विमा अशा विविध योजनांचा लाभ मिळत असल्याने शेतकर्‍यांत विश्वास निर्माण होत आहे. समृद्धी महामार्गालगतदेखील आम्ही कृषी समृद्धी केंद्रे उभारणार आहोत त्याचाही मोठा फायदा तुम्हाला होणार आहे. ठाणे जिल्ह्यातून भेंडी, ढोबळी मिरची निर्यात होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे जलयुक्तच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत. बारमाही शेती शक्य आहे. फक्त शेतकर्‍यांची इच्छाशक्ती हवी, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -