Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी लसीकरणामध्ये मला राजकारण करायचं नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लसीकरणामध्ये मला राजकारण करायचं नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Related Story

- Advertisement -

बीकेसी येथील कोविड सेंटरमध्ये आज पहिला कोरोना लसीचा डोस आहार तज्ज्ञ डॉक्टर मधुरा पाटील यांना दिला गेला आहे. तर दुसरा डोस डॉक्टर मनोज पाचांगे यांना दिला आहे. राज्यव्यापी लसीकरण मोहीमेच्या शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोहीमेच्या शुभारंभानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘कोरोना लसीकरणात राजकारण मला करायचं नाही.’

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

‘आपण गेले काही महिने कोरोना लसीबद्दल ऐकत होतो, लस पाहिलीच नव्हती. ती आज आपल्या समोर आलेली आहे. देशातील प्रत्येक राज्याला किती कोरोना लस दिली जाणार आहे, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोना योद्धांना लस दिली जाईल. त्यांच्यानंतर ५० वर्षांहून अधिक वय असलेल्या व्यक्तींना आणि ५० वर्षाखालील आजार असणाऱ्या व्यक्तींना लस दिली जाईल. जसं जशी कोरोना लसीची उपलब्धता वाढेल, त्याप्रमाणे सर्व नागरिकांना आपण लस खुली करून देऊ,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

आपल्या राज्याहून अधिक पश्चिम बंगालला लसी कोरोना कोटा अधिक मिळाला आहे? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मला कोरोना लसीकरणात राजकारण करायचं नाही. जसं महाराष्ट्रातील नागरिक माझ्यासाठी सारखे आहेत, त्याप्रमाणे देशातील सर्व नागरिक पंतप्रधानांना सारखे आहेत. म्हणून लस कमी वाटपाचा विषय यामध्ये येऊ नये.’

येत्या काळात आणखीन दोन लस उपलब्ध होण्याची शक्यता

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘कोणतही राज्य सरकार स्वतः कोणतही लस द्यावी याबाबत निर्णय घेत नाही. तर केंद्रीय मंत्रालयातील आरोग्य विभाग याचा निर्णय घेत असतं. तसंच कोरोनासंदर्भात सूचना देखील त्यांच्याकडून येत असतात. पण लस कोणती द्यायची याचा निर्णय केंद्र सरकार घेते. अजून दोन ते तीन कंपन्या येत्या काळात कोरोना लस उपलब्ध करून देऊ शकतात. त्याची सध्या चाचणी सुरू असून चाचणीची खात्री पडल्यानंतर लसीकरण करण्यासाठीचा निर्णय घेतला जाईल. ज्या लसीचा साठा केंद्राच्या पुढाकारने राज्यात आलेला आहे, त्याबद्दल शंका असण्याचे कारण नाही. ती कोणाला द्यावी, कशी द्यावी याबद्दल गाईडलाईन स्पष्ट आहेत.’

- Advertisement -

‘आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सध्या लस मोफत दिली जात आहे. पण ज्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना लस दिली जाईल, त्यांची किमत केंद्र सरकार ठरवेल. जेव्हा केंद्र सरकार लसीच्या किमतीबाबत निर्णय जाहीर करतील तेव्हा आम्ही देखील निर्णय घेऊ. जसजसा हा कोटा उपलब्ध होईल, याचे उत्पादन वाढले, तसंतसं सर्वसामान्यांसाठी लस उपलब्ध होईल. यामध्ये काळाबाजार होणार नाही. सर्व सरकारच्या अधिपत्याखाली आहे,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


हेही वाचा – Corona Vaccination: ‘आज आपण एक क्रांतिकारक पाऊल टाकत आहोत’


 

- Advertisement -