घरमुंबईआपल्या देशात 'व्यंगचित्रकारा'ला किंमत नाही - राज ठाकरे

आपल्या देशात ‘व्यंगचित्रकारा’ला किंमत नाही – राज ठाकरे

Subscribe

आज युरोप किंवा बाहेरच्या देशात कलाकारांना जी किंमत आहे ती आपल्या देशात व्यंगचित्रकाराला नाही, असे मत राज ठाकरे यांनी विकास सबनीस यांच्या ५० वर्षांच्या कारकीर्दीचा विशेष गौरव सोहळ्याप्रसंगी केले आहे.

आपल्या देशात व्यंगचित्रकारला किंमत नसल्याचे सांगत जेव्हा आर. के. लक्ष्मण गेले तेव्हा मोजून १०० पण त्यांचे अत्यंदर्शन घेण्यासाठी नव्हते, अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे. तसेच ज्या आरके लक्ष्मण यांची ही अवस्था असेल तर इतरांचे काय बोलायचे असे देखील ते यावेळी म्हणालेत. विकास सबनीस यांच्या ५० वर्षांच्या कारकीर्दीचा विशेष गौरव सोहळा आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित शिवाजी पार्क येथील सावरकर सभागृहात पार पडला त्यावेळी ते बोलत होते.

आपल्या देशात कलाकारांना किंमत नाही

दरम्यान यावेळी राज ठाकरे यांनी मला कल्पना नाही पाच वर्षात विकास दिसला की नाही पण ५० वर्षात मला विकास सबनीसांच्या रूपान दिसला अशी कोपरखळी मारली आहे. आज युरोप किंवा बाहेरच्या देशात कलाकारांना जी किंमत आहे ती आपल्या देशात नाही असे देखील ते म्हणाले. गेली ५० वर्ष व्यंगचित्र कला सोडून कोणतीही नोकरी केलेली नाही. ही कला ५० वर्ष जोपासणे हे आर के लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर विकास सबनीस यांचे नाव घ्यावे लागेल, असे देखील ते म्हणाले.

- Advertisement -

म्हणून मी अविरतपणे व्यंगचित्र काढू शकलो – विकास सबनीस

मी अनेकदा राजकारण्यावर भाष्य काढणारी व्यंगचित्रे काढली पण माझी व्यंगचित्र नेहमीच राजकारण्यांनी खिलाडूवृत्तीने घेतली. त्यामुळेच मी इतकी वर्षे अविरतपणे व्यंगचित्र काढू शकलो असे मत यावेळी प्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस यांनी मांडले आहेत.

प्रख्यात व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचा व्यंगचित्र कारकिर्दीला तब्बल पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल ‘रेषा विकासची भाषा ५० वर्षांची’ या विशेष कार्यक्रमात गौरव करण्यात आला. या गौरव सोहळ्याला कार्टूनिस्टस कंबाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री, ज्येष्ठ पत्रकार शिरीष कणेकर, जेष्ठ व्यंगचित्रकार यशवंत सरदेसाई आणि ज्येष्ठ चित्रकार दत्तात्रय पाडेकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी ‘गाणाऱ्या रेषा’ हा विकास सबनीस यांचा गाण्यांच्या पार्श्वभूमीवरील कार्टून्सचा विशेष कार्यक्रमही सादर करण्यात आला.

- Advertisement -

आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत बद्दल बोलताना सबनीस म्हणाले, “१९६८मध्ये माझ्या कारकिर्दीची सुरुवात झाली. ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये आर के लक्ष्मण आणि ‘मार्मिक’मध्ये बाळासाहेब ठाकरे यांची कार्टून्स बघून मी प्रभावित होत असे. बाळासाहेबांची कार्टून्स आणि त्यामागील त्यांचा राजकीय विचार आणि त्यामागील विचारशक्ती हे मला प्रभावित करत असत. त्यामुळेच मी राजकीय कार्टूनिस्ट होण्याचे ठरवले आणि स्वतः शिकत गेलो. ही सुरुवात प्राथमिक शाळेपासूनच झाली. हे माझ्या करियरचे ४९ वे वर्ष असून पुढील वर्षी पन्नास वर्षे पूर्ण होतील.” तसेच “मी जेव्हा कार्टूनिस्ट म्हणून करीयरची सुरुवात केली तेव्हा मला माझ्या मित्रांनी एखादी मीडिया एजन्सी जॉईन करून कमर्शियल कार्टूनिस्ट होण्याचा सल्ला दिला. त्यातून मला चांगले पैसे मिळाले असते, पण मला मात्र पॉलिटिकल कार्टूनिस्टचं व्हायचे होते. कार्टूनिस्ट म्हणून माझा सर्वाधिक मोलाचा क्षण म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला त्यांचा वारसदार म्हणून ‘मार्मिक’मध्ये कार्टून काढण्याची संधी दिली तो. मी त्यांच्या कॉलमसाठी कार्टून काढत असे. तोच माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार होता असे ते यावेळी म्हणालेत.


हेही वाचा – सामुहिक विवाह स्पर्धा: राज ठाकरे ५०० तर भाजपचं १००० लक्ष्य

हेही वाचा – अजित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; दीड तास चर्चा रंगली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -