घरमुंबईतोंडात सेफ्टी पिन अडकलेल्या कासवाची सुखरुप सुटका

तोंडात सेफ्टी पिन अडकलेल्या कासवाची सुखरुप सुटका

Subscribe

तोंडात सेफ्टी पिन अडकून जखमी झालेल्या इंडियन सॉफ्टशेल कासवाची पवईत सुखरुप सुटका करण्यात आली आहे. प्लँट अँड अॅनिमल वेल्फेयर सोसायटी म्हणजेच पॉज या संस्थेने या दोन्ही कासवांवर योग्य उपचार करुन या दोन्ही कासवांची सुटका केली आहे.

तोंडात सेफ्टी पिन अडकून जखमी झालेल्या इंडियन सॉफ्टशेल कासवाची पवईत सुखरुप सुटका करण्यात आली आहे. प्लँट अँड अॅनिमल वेल्फेयर सोसायटी म्हणजेच पॉज या संस्थेने या दोन्ही कासवांवर योग्य उपचार करुन या दोन्ही कासवांची सुटका केली आहे.

पवई तलावाजवळ दोन लहान मुलांकडे हे दोन कासव आढळले होते. अम्मा केअर फाउंडेशनच्या स्वयंसेविका सविता करलकर यांना त्या दोन मुलांकडे कासव असल्याचा संशय आला. त्यातील एका कासवाच्या तोंडाला सेफ्टी पिन अडकल्यामुळे जखम झाली होती. सविता यांनी तात्काल पॉज संस्थेच्या हेल्पलाईनवर संपर्क करून कासवांची माहिती दिली. त्यानंतर, संस्थेच्या स्वयंसेवकांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही कासवांना ताब्यात घेतले. तेव्हा स्वयंसेवकांनी त्या मुलांची विचारपूस केल्यानंतर कळलं की, कासवांना पाळण्यासाठी घरी नेलं जाणार होतं. पण, स्वयंसेवकांनी दोन्ही कासव ताब्यात घेत पॉज संस्थेकडे उपचारांसाठी पाठवलं.

- Advertisement -

याविषयी अधिक माहिती देताना सविता करलकर यांनी सांगितलं की, ” सकाळी १० वाजताच्या सुमारास बसने अंधेरीहून भांडूपकडे जात असताना ही दोन मुले काहीतरी संशयास्पद हालचाली करताना दिसून आली. बसमधून उतरून त्यांच्याजवळ गेले. तेव्हा दोन जीवंत कासव त्यांच्याकडे होती. एका कासवाच्या तोंडात सेफ्टी पिन अडकलेला आढळून आला. तसेच मुलांकडे मासे पकडण्याचा प्लास्टिकचा गळही जप्त करण्यात आला. याच गळामध्ये ही दोन्ही कासवे अडकली होती.”

दरम्यान, इंडियन सॉफ्टशेल टर्टल या प्रजातीची ही दोन्ही कासव आहेत. तोंडात सेफ्टी पिन अडकली होती, ती सुखरूपणे काढण्यात आली. जखमेवर औषधोपचार केले. कासवांच्या तोंडाला कुठलीही खोल जखम किंवा सूज आढळून आली नाही. दोन्ही कासवांची प्रकृती स्थिर असून आहारही योग्य पद्धतीने सुरू आहे. तसेच दोन्ही कासवांची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे, अशी माहिती पशु चिकित्सक राहुल मेश्राम यांनी दिली.

पवई तलावातून कासवांची चोरी होऊ नये, यासाठी तलावाच्या परिसरात नियमित गस्त सुरू करण्यासाठी वनविभागाला संस्थेकडून पत्र लिहिले जाणार आहे. इंडियन सॉफ्टशेल टर्टल या प्रजातीचे कासव वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या सुची १ नुसार संरक्षित आहे. त्यामुळे त्यांची शिकार, पाळणे, विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. 
– सुनीष कुंजू, सचिव, पॉज (मुंबई) संस्था
या कासवांबद्दल वन विभागाला कळवण्यात आले आहे आणि त्यांना लवकरच त्यांना सोडण्यात येईल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -