Friday, January 15, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई 'कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीला सत्ताधारीच जबाबदार'

‘कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीला सत्ताधारीच जबाबदार’

मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी कल्याण डोबिंवलीत वाहतूक कोंडीला जबाबदार हे सत्ताधारी पक्ष आहेत, असा आरोप केला आहे. सत्ताधारी आणि प्रशासनाकडून एकमेकांकडे बोट दाखवल्याने आश्यर्च व्यक्त होत आहे.

Related Story

- Advertisement -

कल्याणचा पत्रीपूलाचे रेंगाळलेले काम आणि डोंबिवलीतील कोपर पूल बंद करण्याचा निर्णय यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे. मात्र यावरून सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला जबाबदार धरले आहे. तर प्रशासनाने रेल्वेकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची टोलवा टोलवीच सुरू आहे. मात्र या सगळयाला सत्ताधारी शिवसेना भाजप जबाबदार असल्याचा आरोप मनसेचे गटनेता मंदार हळबे यांनी केला आहे. वाहतूक कोंडीमुळे कल्याण डोंबिवलीकर हैराण झाला आहे. त्यासंदर्भात मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी आवाज उठवला.

सत्ताधारी आणि प्रशासनाकडून एकमेकांकडे बोट 

त्यावेळी त्यांनी प्रशासनावरच खापर फोडले. मात्र प्रशासनाचे प्रमुख असलेले आयुक्त गोविंद बोडके यांनी प्रशासनाची काहीही चूकी नसून त्यांनी रेल्वेकडेच बोट दाखवले होते. सत्ताधारी आणि प्रशासनाकडून एकमेकांकडे बोट दाखवल्याने आश्यर्च व्यक्त होत आहे. मात्र या सगळया प्रश्नावर मनसेने सत्ताधारी जबाबदार असल्याचा थेट आरोप केला आहे.

राज्यमंत्री आमदार आणि खासदार कमी पडले

- Advertisement -

एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि रेल्वे ही यंत्रणा पालिकेच्या अख्यातरीत येत नाहीत. मात्र या यंत्रणेकडून वेळोवेळी परवानगी घेणे आणि पाठपुरावा करण्यासाठी राज्यमंत्री आमदार आणि खासदार कमी पडले आहेत हे सत्ताधारी नगरसेवकांनीही मान्य केले आहे, असेही हळबे म्हणाले.

‘या’ समस्या भविष्यात चांगल्याच महागत पडणार

कल्याण डोंबिवलीत एकूण चार आमदार आहेत तर दोन खासदार आणि एक राज्यमंत्री हे सगळी पदं शिवसेना भाजपकडे आहेत असे असतानाही कल्याण डोबिंवलीकरांना वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सत्ता असतानाही राबविता येत नाही त्यामुळे इथले सत्ताधारी निष्क्रीय ठरल्याचे महासभेत दिसून आल्याचे हळबे यांनी म्हटले आहे त्यामुळे पत्रीपूल आणि कोपर पुलाचा प्रश्न आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी या समस्या भविष्यात शिवसेना भाजपला चांगल्याच महागत पडणार असल्याचेच दिसून येतय.

- Advertisement -