घरमुंबईदरवर्षीप्रमाणे केडीएमसीतर्फे गणेश दर्शन स्‍पर्धेचे आयोजन

दरवर्षीप्रमाणे केडीएमसीतर्फे गणेश दर्शन स्‍पर्धेचे आयोजन

Subscribe

केडीएमसीतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश दर्शन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ७ ते १० दिवसांच्‍या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांसाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे.

एकता आणि अखंडतेचं प्रतिक असलेला श्री गणेशोत्‍सव यावर्षी भाद्रपद महिन्‍यातील २ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत सर्वत्र साजरा होणार आहे. महापालिका क्षेत्रातील ७ आणि १० दिवसांच्‍या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांसाठी महापालिकेतर्फे याही वर्षी गणेश दर्शन स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. सदर स्‍पर्धेसाठी आवश्‍यक असलेले अर्ज जनसंपर्क विभाग, मुख्‍यालय आणि सर्व प्रभागक्षेत्र कार्यालयातून स्‍पर्धकांना उपलब्‍ध करण्‍यात आले आहेत. अर्ज दिनांक १९ ऑगस्‍ट पासूनवरील कार्यालयांमध्‍ये कामांच्‍या दिवशी विनामुल्‍य उपलब्‍ध होतील.

हे अर्ज स्विकारण्‍याच्‍या अंतिम दिनांक ३० ऑगस्‍ट असून या दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत जनसंपर्क विभाग, मुख्‍यालय येथे अर्ज स्विकारण्‍यात येतील. तद्नंतर आलेल्‍या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे पालिकेने कळवले आहे. सदर स्‍पर्धेत भाग घेतलेल्‍या गणेशोत्‍सव मंडळांना परिक्षक ४ सप्‍टेंबर ते ६ सप्‍टेंबर २०१९ या दरम्‍यान सायंकाळी ७ वाजल्‍या नंतर भेट देतील. या स्‍पर्धेसंबंधी परिक्षक मंडळांचा निर्णय सर्व स्‍पर्धकांसाठी बंधनकारक राहील.

- Advertisement -

स्‍पर्धेच्‍या प्रवेश अर्ज भरुन देताना मंडळांनी आपापला पत्‍ता सविस्‍तर (लॅन्‍डमार्कसह) आणि मोबाईल नंबरसह पूर्ण लिहावा. जेणेकरून परिक्षकांना आपल्‍या ‘उत्‍सव मंडपा’ पर्यंत पोहोचणे सुलभ होईल. परिक्षणादरम्‍यान स्‍पर्धकांनी परिक्षक मंडळास सहकार्य करावे. गणेश सजावटीजवळ मुर्तीकार आणि सजावटकार यांची नावे ठळक अक्षरांत दर्शनी भागांवर लावावीत. गौरीबरोबर विसर्जन होणाऱ्या आणि घरांमध्‍ये बसविलेल्‍या गणेश मंडळांना या स्‍पर्धेत भाग घेता येणार नाही.

कोणकोणत्या बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत?

सदर पुरस्‍कारांसाठी निवड करताना गणेश मुर्तीची सुबकता, तिची उंची, मुर्ती बनवितांना वापरण्‍यात आलेले साहित्‍य (शाडुमाती, इकोफ्रेंडली) यांचा प्रामुख्‍याने विचार केला जाईल. याव्‍यतिरिक्‍त देखाव्‍यांसाठी निवडलेल्‍या विषयांमध्‍ये प्रामुख्‍याने स्‍त्रीभ्रुण हत्‍या, स्‍त्री शिक्षण, पाणी वाचवा, स्‍मार्ट सिटी, पर्यावरणाचा समतोल (ध्‍वनी, जल वायु प्रदुषण), कचरा व्‍यवस्‍थापन (ई-कचरा, घनकचरा) निर्माल्‍याचे नियोजन तसेच मंडळांची विधायक कार्ये, स्‍वच्‍छता अभियान, गणेशोत्‍सवाच्‍या कालावधीत स्‍वच्‍छता मोहिमेस दिलेला प्रतिसाद आदी बाबी विचारात घेतल्‍या जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -