घरमुंबईलालबागच्या राजाचे २४ तास लाईव्ह दर्शन

लालबागच्या राजाचे २४ तास लाईव्ह दर्शन

Subscribe

लालबागच्या राजाचे मुखदर्शन शुक्रवारी करण्यात आले. राजाच्याभोवती चांद्रयानचा देखावा यंदाच्या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य असेल.

जगभरातील कोट्यवधी गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असणार्‍या आणि नवसाला पावणारा राजा म्हणून ख्याती असणार्‍या लालबागचा राजाचे गणेशभक्तांना माय महानगरच्या वेबसाईटवर थेट दर्शन सोमवार २ सप्टेंबरपासून घेता येणार आहे. www.mymahanagar.com या वेबसाईटवर गणेशभक्तांना घरबसल्या बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत चोवीस तास ही सुवर्णसंधी गणेशभक्तांना मिळणार आहे. यावेळी राजाची आरती, इतर विशेष पूजादेखील गणेशभक्तांना थेट पाहता येईल. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

दरम्यान, शुक्रवारी पार पडलेले राजाचे प्रथम दर्शनाचेही थेट प्रेक्षपण माय महानगरच्या वेबसाईटवर गणेशभक्तांसाठी करुन देण्यात आले. ज्याला भक्तांनी उदंड प्रतिसाद दिला. मंडळातर्फे गेल्यावर्षीप्रमाणे ऑगमेटेंड रिअ‍ॅलिटी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चांद्रयानाची विशेष मोहीम याठिकाणी दिसणार आहे.

- Advertisement -

लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदाचा देखावा भारताची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्त्रो’ च्या कार्य कर्तुत्वाला सलाम करणारा साकारला आहे. नुकतेच इस्त्रोने अवकाशात सोडलेले ‘चांद्रयान २’ चंद्राच्या कक्षेत प्रदक्षिणा घालत आहे. चांद्रयान २ मधून लँडर ‘विक्रम’ ७ सप्टेंबर २०१९ रोजी पहाटे चांद्रभूमीवर साँफ्ट लँडिंग करणार आहे.

या ऐतिहासिक क्षणाचे आपण सारेच साक्षीदार होणार आहोत. सर्व भारतीयांचा देशाभिमान जागृत करणारा हा ऐतिहासिक क्षण लालबागच्या राजाच्या दरबारात थेट पाहता येणार आहे. यंदाच्या वर्षी लालबागचा राजा चांद्रभूमीवर विराजमान झाला आहे. चांद्रभूमीवर विराजमान झालेला लालबागचा राजा जणू काही भारताच्या ‘चांद्रयान २’ चे राजेशाहीत स्वागत करत आहे. भारताच्या ‘चांद्रयान २’ मोहिमेसोबत भविष्यातील ‘गगनयान’ या भारतीय अंतराळवीरांना अवकाशात घेऊन जाणार्‍या मोहिमेसाठीही लालबागचा राजा राजेशाहीत शुभेच्छा देत आहे. भारताला सुपर पॉवर बनवण्यासाठी इस्त्रो करत असलेल्या ऐतिहासिक कामगिरीचा गौरवच यंदा लालबागाच्या राजाच्या राजेशाही दरबारात पहायला मिळणार आहे. सोमवारपासून लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन माय महानगरच्या वेबसाईटवर पाहता आले, असे मंडळाचे मानद सचिव सुुधीर साळवी यांनी सांगितले. राजाच्या मनमोहक रुपाने यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून विशेष म्हणजे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या देखाव्याने सर्वांची मने जिंकली आहेत. तर माय महानगरतर्फे हा देखावा गणेशभक्तांपर्यंत पोहचविल्याने वाचकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

- Advertisement -

७ सप्टेंबरला विशेष सोहळा
यंदाही कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून देखावा उभारण्यात आला आहे. ५ सप्टेंबर रोजी विशेष सोहळा याठिकाणी पहायला मिळणार आहे. ७ सप्टेंबर रोजी चांद्रयान चंद्राच्या कक्षेत झोपावणार असून त्याचा विशेष सोहळा लालबागच्या राजाच्या मंडपात अवतरणार असल्याची माहिती मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली. यासाठी इस्त्रोची मदत देखील घेतली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

राजाच्या जयघोषांनी परिसर दणाणला                                                                                        सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन शुक्रवारी मोठ्या उत्साहात झाले. यावेळी लालबागच्या राजाचा विजय असो, ही शान कोणाची लालबागच्या राजाची, अशा अनेक जयघोषांनी यावेळी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -