घरमुंबईउल्हासनगरमधील पाच मजली इमारत कोसळली; जीवितहानी नाही

उल्हासनगरमधील पाच मजली इमारत कोसळली; जीवितहानी नाही

Subscribe

उल्हासनगरमधील पाच मजली महक इमारत मंगळवारी सकाळी कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

उल्हासनगरमधील पाच मजली महक इमारत आज, मंगळवारी सकाळी कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. काल, सोमवारी सकाळी ही इमारत कलंडली होती. त्यामुळे फ्लैटचे दरवाजे आपोआप जॅम झाले होते. या अनपेक्षित घटनेने घाबरलेल्या रहिवाशांनी फोनाफोनी केल्यावर पालिका तसेच अग्निशमन दलाने रहिवाशांना बाहेर काढून ३१ फ्लॅट रिकामे केले. त्यामुळे अनर्थ टळला.

महक ही ५ मजली इमारत उल्हासनगरातील कॅम्प नंबर ३ मधील फर्नीचर बाजारपेठेच्या लिंकरोडवर असून त्यात ३१ फ्लॅट आहेत. पप्पू कलानी यांच्या राजवटीतील काळात ही इमारत उभारण्यात आली आहे. पालिकेने जाहिर केलेल्या अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचा समावेश नसल्याने नागरिक गुण्यागोविंदाने निश्चिंतपणे राहत होते. मात्र काल सकाळच्या सुमारास ही इमारत झुकल्याने फ्लॅट धारकांचे दरवाजे जॅम झाले. अनेकदा प्रयत्न करूनही दरवाजे उघडत नसल्याने घाबरलेल्या रहिवाशांनी फोनाफोनी केली. आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशानव्ये सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, भगवान कुमावत, अग्निशमन अधिकारी भास्कर मिरपगार यांनी धाव घेत जॅम झालेले दरवाजे उघडून ३१ फ्लॅटमधील रहिवाशांना बाहेर काढून इमारत रिकामी केली. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसात बेघर होण्याची तसेच नातलगांच्या घरात आश्रय घेण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे.

- Advertisement -

इमारत सुरक्षित आहे की नाही यासाठी महापालिकेच्यावतीने स्ट्रक्चर ऑडिट करून झुकलेली महक ही इमारत व्यवस्थित किंबहुना सुरक्षित आहे की नाही, हा अहवाल बघून आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्यात येणार, अशी माहिती सहाय्यक आयुक्त भगवान कुमावत यांनी दिली.

हेही वाचा –

विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नितीन गडकरींची घरवापसी

- Advertisement -

पालघरमध्ये एसटी बसला अपघात; १४ विद्यार्थी जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -