आणि उर्मिलाने केला बेस्टमधून प्रवास

बेस्ट (BEST) ही मुंबईची शान आहे, मुंबईची लाईफ लाईन आहे, तिला वाचवणे गरजेचे आहे.

Mumbai

उत्तर मुंबईच्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी आज पोयसर डेपो येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी बेस्ट कामगारांच्या सर्व समस्या उर्मिला मातोंडकरांनी जाणून घेतल्या. यावेळी बेस्ट कामगारांच्या सर्व समस्या उर्मिला मातोंडकरांनी जाणून घेतल्या. यावेळी, बेस्ट (BEST) ही मुंबईची शान आहे, मुंबईची लाईफ लाईन आहे, तिला जिवंत ठेवलेच पाहिजे, तिला वाचवणे गरजेचे आहे. मी माझ्या शालेय जीवनाचा संपूर्ण प्रवास बेस्टने केलेला आहे. तसेच कॉलेजला ही मी बेस्टनेच जायची त्यामुळे बेस्ट हि नेहमीच माझ्या मनामध्ये आहे. परंतु आज बेस्टची दुर्दशा झालेली आहे, असे उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

सत्ताधाऱ्यांचे बेस्टकडे दुर्लक्ष

तसेच, गेली २५ ते २७ वर्षे महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपची सत्ता असून नेहमीच बेस्टकडे दुर्लक्ष केले. बेस्ट कामगारांना बोनस नाही, वेळेवर पगार नसल्याने त्यांच्या राहणीमानात कोणतीच सुधारणा झाली नाही. अशा अनेक समस्या बेस्टच्या आहेत. बेस्टचे कमीत कमी भाडे ७ रुपयांवरून १२ रुपये केले याचाच अर्थ सत्ताधाऱ्यांना पैसा मिळत आहे. तरी देखील बेस्टची अवस्था दयनीय झालेली आहे. इतकी वर्षे शिवसेना भाजपची सत्ता असूनही बेस्टसाठी त्यांनी काहीच केलेले नाही, असे ही सांगितले.

बेस्टला वैभवशाली दिवस आणू

‘बेस्ट वाचविणे हे त्यांचे पहिले कर्तव्य आहे. पण फक्त खोटी आश्वासने दिली गेली. त्यामुळे आता सत्तांधारांची हीच खरी वेळ आहे. यावेळी तुम्ही सर्व जण काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे रहा. मला तुम्ही निवडून द्या मी संसदेत तुमचे सर्व प्रश्न मांडीन ते सोडवेन. काँग्रेस तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. आम्ही तुमच्या सर्व मागण्या मान्य करू. बेस्टला पुन्हा वैभवशाली दिवस आणून देऊ’  अशी ग्वाही देत मतं देण्याचे अवाहन केले.

या कार्यक्रमाला उर्मिला मातोंडकर यांच्यासोबत भूषण पाटील आणि नितीन पाटील, अध्यक्ष, बेस्ट एम्प्लॉईज युनियन, बेस्ट कामगार युनियन, बेस्ट कामगार संगठन, राष्ट्रवादी बेस्ट युनियन आणि जागृत बेस्ट कामगार संगठन यांचे पदाधिकारी ही उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here