घरमुंबईमूठभर लोकांमुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे - मुख्यमंत्री

मूठभर लोकांमुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे – मुख्यमंत्री

Subscribe

वैधानिक कारवाई पूर्ण होऊ शकत नाही तोपर्यंत अशा गोष्टी सोडवता येऊ शकत नाहीत असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आहे.

सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून रान पेटलेले असताना आज मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधत मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याच सांगत काही मूठभर लोकांमुळे महाराष्ट्र बदनाम होत असल्याची जोरदार टीका केली. मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे शांततेत निघालेत. आता देखील आंदोलकांनाही हिंसा नकोय मात्र पण काही लोक या आंदोलनाला बदनाम करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच आरक्षणावर प्रभावी पावलं सरकार उचलत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. याचसोबत मराठा समाजासह कोणत्याही समाजावर सरकार अन्याय करणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. लोकशाहीमध्ये चर्चा महत्त्वाची असते पण काही जण म्हणतात आम्हाला चर्चा नको माझी एक विनंती आहे की चर्चेने सगळे विषय सुटतात काही सुचना तुम्हाला सरकारला सुचवायच्या असतील तर सुचवा मात्र चर्चा करू आणि हा विषय सोडवू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कायदेशीर प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार 

राज्य मागास आयोग स्वायत्त आहे त्यामुळे सरकार कोणताही दबाव टाकू शकत नाही मात्र मराठा आरक्षणाबाबतची कायदेशीर प्रक्रिया ही नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगा भरतीला स्थगिती देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणासोबत धनगर समाजाच्या आरक्षणावर देखील राज्य सरकारने टीआयएसएसला अभ्यास करायला सांगितले असून, ऑगस्ट महिन्याच्या शेवटी त्याचा रिपोर्ट येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

  • गरज पडल्यास विशेष अधिवशेन बोलावरणार
  • मेगा भरतीत मराठा तरुणांवर अन्याय होणार नाही
  • मराठा विद्यार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचे काम सुरू आहे
  • जोपर्यंत महाराष्ट्र शांत होत नाही तोवर अविरत प्रयत्न कारायला हवेत
  • त्यासाठी दोन पावलं मागे जायचे असेल तर जाण्याची तयारी
  • कुणीही आत्महत्या करू नका सरकार सकारात्मक आहे
  • राज्य सरकार मागास आयोगावर दबाव आणू शकत नाही
  • दंगलीमुळे गुंतवणुकदार महाराष्ट्रात येणार नाही
  • ही वेळ राजकीय कुरघोडी, सत्तापक्ष आणि विरोधकांची नाही ही वेळ एकत्र येऊन समाजाला दिशा देण्याची आहे
  • सरकारला निर्णयात मदत करा
  • सोशल मीडियावर समाजाला भडकवलं जात आहे
  • सरकार चुकत असेल तर ते सरकारच्या लक्षात आणून द्या
  • ही वेळ राजकीय कुरघोडीची नाही
  • स्थानिक यंत्रणांनी सहकार्य करावे
  • मराठा आरक्षण मेगा भरतीला स्थगिती
  • राज्य मागास आयोग पूर्णपणे स्वायत्य आहे. त्यामुळे या आयोगावर कुठलीही जबरदस्ती सरकार करू शकत नाही
  • मराठा तरुणांवर कोणताही अन्याय होणार नाही याची खबरदारी सरकार घेत आहे
  • मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायालयात असून ७ ऑगस्टला अहवाल कधी देणार याबाबत राज्य मागास आयोग न्यायालयात अहवाल मांडणार आहे
  • नोव्हेंबर महिना संपेपर्यंत वैधानिक बाबी पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -