घरमुंबई२०५२ कागदी पिशव्यांनी साकारली महाराजांची प्रतिमा

२०५२ कागदी पिशव्यांनी साकारली महाराजांची प्रतिमा

Subscribe

राज्यभरात प्लास्टिकचा वापर थांबवा याकरता नवी मुंबईतील एका नागरिकांनी कागदी पिशव्यांचा वापर करुन महाराजांची प्रतिमा साकारली आहे. यातून त्यांनी नागरिकांना कागदी पिशव्यांचा वापर करण्याचा संदेश दिला आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी राज्यसरकाने मुंबईसह संपूर्ण राज्यभरात प्लास्टिक बंदी लागू केली आहे. प्लास्टिक वापरणाऱ्यांवर सरकार दंडात्मक कारवाई करणार अशी तंबी देखील देण्यात आली आहे. मात्र तरी देखील प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. या पिशव्यांचा वापर थांबवा आणि कागदी पिशव्यांचा वापर लोकांनी अधिकाअधिक करावा, हा संदेश देण्यासाठी नवी मुंबईतल्या एका नागरिकांनी २ हजार ५२ कागदी पिशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली आहे. आबासाहेब शेवाळे असे प्रतिमा साकारणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

या प्रतिमेने नोंदवला विश्वविक्रम

जगातील सर्वात मोठी कागदी पिशव्यांमधून साकारलेली प्रतिमा म्हणून युनिक वर्ल्ड रिकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे. २ हजार ५२ कागदी पिशव्यांच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांची १३ बाय १८ आकाराची प्रतिमा साकारण्यात आली आहे. तसेच या प्रतिमेची इंडिया बुक ऑफ रिकॉर्डमध्येही १०० जणांच्या यादीत या प्रतिमेची नोंद झाली आहे. यापूर्वी देखील त्यांनी अनेक कागदी दिव्यापासून प्रतिमा साकारली होती. त्याचीही लिम्का बुक ऑफ रिकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्याचबरोबर सॉफ्ट बोर्ड पिनच्या साह्याने त्यांनी ३४ वेगवेगळे पोर्टरेट देखील साकारले होते. त्याचीही नोंद लिम्का बुक ऑफ रिकॉर्डमध्ये झाली आहे.

- Advertisement -

अशी साकारली प्रतिमा

कागदी पिशव्यांच्या सहाय्याने प्रतिमा साकारण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या रंगाच्या ४ बाय ४ या आकाराच्या कागदी पिशव्यांचा वापर केला आहे. या पिशव्याही त्यांनी स्वत:च तयार केल्या होत्या आणि त्यातून त्यांनी ही प्रतिमा साकारली आहे.

आबासाहेब यांच्याविषयी थोडक्यात

कोपरखैरणे येथे राहणारे आबासाहेब शेवाळे हे अॅनिमेशन डिझायनर आहेत. त्यांचा नेहमीच काहीतरी वेगळे करण्याचा कल असतो. तसेच राज्यभरातून प्लास्टिक हद्दपार व्हावे याकरता त्यांचा प्रयत्न असतो. तसेच नागरिकांनी प्लास्टिक बॅग वापरु नये, यासाठी त्यांनी कागदी आणि कापडी पिशव्यांचे वाटपही केले आहे.

- Advertisement -


वाचा – ३३,००० रुद्राक्षांनी साकारली बाळासाहेबांची प्रतिमा

वाचा – या सात वर्षाच्या जादुगाराने केले सात वर्ल्ड रेकॉर्ड्स


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -