‘प्रवेश द्या, नाहीतर राजीनामा द्या’; मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम

वैद्यकिय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतून बाद झाल्यामुळे मराठा समाजाचे विद्यार्थी आक्रमक झाले असून आज मराठा समाजाने आझाद मैदानात तीव्र आंदोलन छेडले आहे.

Mumbai
maratha medical student protest on aazad maidan
वैद्यकिय पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे आंदोलन

वैद्यकिय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतून बाद झाल्यामुळे मराठा समाजाचे विद्यार्थी आक्रमक झाले असून आज मराठा समाजाने आझाद मैदानात तीव्र आंदोलन छेडले आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सरकराने त्वरित अद्यादेश काढून वैद्यकिय प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा अन्यथा राजीनामा द्यावा, अशी तीव्र मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

यामुळे २५० विद्यार्थ्यांचे वर्ष जाणार वाया

नागपूर खंडपीठाने पदव्युत्तर दंत वैद्यकीय प्रवेशा संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना, मराठा अरक्षाणाचा कायदा लागू होण्याआधी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याने मराठा आरक्षणानुसार प्रवेश देता येणार नसल्याचा निर्णय दिला होता. त्यावर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र नागपूर खंडपीठाचा निर्णय अबाधित ठेवत सर्वोच्च न्यायालयाने यावर्षी मराठा आरक्षण दंत वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश होणार नसल्याचे सांगितले. न्यायालयाचा या निर्णयामुळे तब्बल २५० विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. सरकराने यावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी करत गेले सात दिवस मराठा विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलन करत आहेत.

मंत्रालयात मुख्यमंत्री नसल्याने अजित पवार निघून गेले

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांची आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा हक्क फडणवीस सरकारला कोणी दिला?, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. या मुलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत त्यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांची भेट ही घेतली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात पोहचले मात्र, मुख्यमंत्री मंत्रालयात उपस्थित नसल्याची माहिती मिळताच अजित पवार आल्या पावली परतले.


वाचा – दुष्काळ निवारण आणि टंचाई आराखड्याची अंमलबजावणी करा – मुख्यमंत्री