माटुंगा रोड स्थानकाचा पादचारी पूल तोडणार

१५ नोव्हेंबरपासून हा पूल होणार बंद

Mumbai
MATUNGA BRIDGE

मुंबई:-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानक अर्थात आताचे प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर गेल्यावर्षी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अनेकांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेने पादचारी पुलाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. पश्चिम रेल्वेने पुढील दोन वर्षात पश्चिम रेल्वे मार्गावरील ७४ नवीन पादचारी पूल बांधण्याचा आणि जे धोक्यादायक पादचारी पूल आहेत ते तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील माटुंगा रोड स्थानकाच्या पादचारी पूल तोडण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने आखले आहेत. त्यासाठी पश्चिम रेल्वेकडून हा पूल १५ नोव्हेंबर २०१८ पासून बंद करण्यात येणार आहे.

एल्फिन्स्टन घटनेनंतर रेल्वेवरील पादचारी पुलाच्या अपुर्‍या आणि अरुंद पुलांचा प्रश्न अधोरेखित झाला होता. ही घटना लक्षात घेता पश्चिम रेल्वेने पुढील दोन वर्षात पश्चिम रेल्वे मार्गावरील ७४ नवीन पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्व पादचारी पुलाचे सर्वेक्षणसुद्धा करण्यात आले होते. जे पूल धोकादायक आहेत, अशा पादचारी पुलांना तोडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आला होता. त्यापैकी माटुंगा रोड स्थानकाचा पूल आता तोडण्यात येणार आहे. त्यासाठी १५ नोव्हेंबर पासून हा पूल प्रवाशांसाठी बंद करण्यांत येणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढची संख्या आणि या मार्गावरील व्यवसायिक केंद्रांची भरभराट झाल्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढली आहे.

पश्चिम रेल्वेने यावर्षी १३ पादचारी पूल बांधले आहेत. तर ३४ पादचारी पुलांचे काम सुरु असून पुढच्या वर्षी जूनपर्यंत काम पूर्ण होईल. तर उर्वरीत बांधकाम २०२० पर्यंत पूर्ण होईल असं पश्चिम रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर प्रवाशांना दिल्या जाणार्‍या सोयी- सुविधांमुळे पश्चिम रेल्वे वारंवार टीकेचे केंद्रस्थान बनले आहे. हे सर्व लक्षात घेता पश्चिम रेल्वेने प्रवाशांना चांगल्या सोयी-सुविधा देण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर पादचारी पूल, स्वयंचलित जिने आणि लिफ्टच्या सोयीदेखील उपलब्ध करुन दिल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here