घरमुंबई'मायावती होऊ शकतात भावी पंतप्रधान!'

‘मायावती होऊ शकतात भावी पंतप्रधान!’

Subscribe

पुढचे पंतप्रधान राहुल गांधी की नरेंद्र मोदी? या चर्चेमध्ये आता आणखी एक नाव समोर आलं आहे. मायावती देखील पुढच्या पंतप्रधान होऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.

देशात काँग्रेस विरुद्ध भाजप आणि राज्यात भाजप विरूद्ध राज ठाकर असं चित्र उभं राहिलेलं असताना आता या सगळ्यामध्ये समाजवादी पक्षानं देखील उडी घेतली आहे. ‘मोदी वेगवेगळ्या देशांमध्ये फिरतात. बॉलिवुडमधल्या कलाकारांना सुद्धा मुलाखती देतात. पण मोदी मर्द असतील तर त्यांनी रवीश कुमार आणि विनोद दुवा या दोघांना मुलाखत देऊन दाखवावी’, असं थेट आव्हान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी नरेंद्र मोदींना दिलं आहे. मुंबईच्या पत्रकार भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सपा-बसपा आघाडी आणि भाजपची कार्यपद्धती याविषयी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. तसेच, ‘मायावती देशाच्या पुढच्या पंतप्रधान होऊ शकतात’, असं देखील अबू आझमी यावेळी म्हणाले.

मायावतीही होऊ शकतात पंतप्रधान?

दरम्यान, यावेळी अबू आझमी यांनी मायावती पंतप्रधान होण्याची अजब शक्यता वर्तवली. ‘या निवडणुकांमध्ये प्रादेशिक पक्षांचा प्रभाव दिसून येत आहे. उत्तर प्रदेशमधून मायावती-अखिलेश यादव, प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी, तेलंगणातून चंद्राबाबू नायडू, केसीआर असे नेते प्रभावी ठरत आहेत. जर उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपा आघाडीने ४० ते ५० जागा जिंकून आणल्या, तर नक्कीच मायावती पंतप्रधान पदाच्या प्रमुख दावेदार असतील’, असा दावा अबू आझमींनी यावेळी केला.

- Advertisement -

हेही वाचा – …तर नरेंद्र मोदींना काळ्या पाण्याची शिक्षा द्यावी लागेल – सचिन सावंत

मोदींना पराभव दिसू लागलाय म्हणूनच…!

दरम्यान, यावेळी अबू आझमी यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर देखील टीका केली. ‘शहीद करकरेंबद्दल आक्षेपार्ह विधानं करणाऱ्या आणि मालेगाव बॉम्बस्फोटांमध्ये आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंहला भाजपनं उमेदवारी देण्याचा मी निषेध करतो. मोदींना विजय मिळणार नसल्याचं पटलंय. त्यामुळेच हिंदुत्वाचा मुद्दा करून साध्वीला उमेदवारी दिली आहे. अशी माणसं जर संसदेत जाणार असतील, तर देशवासियांनी विचार करायला हवा’, असं आझमी यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -