घरमुंबईबापरे! हवेच्या प्रदूषणामुळे देशात लाखो लोकांचा मृत्यू

बापरे! हवेच्या प्रदूषणामुळे देशात लाखो लोकांचा मृत्यू

Subscribe

भारतात २०१७ मध्ये १२.४ लाख नागरिकांचा हवेच्या प्रदुषणाशी संबंधित आजारामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हवेच्या प्रदूषणामुळे एक लाखापेक्षा अधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. त्यामुळे हवेच्या प्रदूषणावर मार्ग काढणे फार गरजेचे आहे.

काही दिवसांपूर्वी ‘सफर’ या संकेतस्थळावर मुंबईच्या वातावरणासंबंधित एक महत्त्वाची बाब समोर आली होती. मुंबईच्या हवेमध्ये धुलिकणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून धूलिकणांचे प्रमाण ३२२ पर्यंत पोहोचले आहेत. आता हवेच्या प्रदुषणासंबंधित अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जागतिक अभ्यास पाहणीच्या निष्कर्षांतून भारतात २०१७ मध्ये १२.४ लाख नागरिकांचा हवेच्या प्रदुषणाशी संबंधित आजारामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हवेच्या प्रदूषणामुळे एक लाखापेक्षा अधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. त्यामुळे हवेच्या प्रदूषणावर मार्ग काढणे फार गरजेचे आहे. हवेच्या प्रदूषणासंबंधित हा अहवाल ‘लान्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नल’ या वैज्ञानिक नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आहे.

काय म्हटले आहे अहवालात?

अहवालात म्हटले आहे की, हवेत तरंगणारे आणि श्वसनावाटे शरीरात जाणारे धूलिकण हे नागरिकांच्या आरोग्यास अत्यंत धोकादायक ठरत आहेत. २०१७ मध्ये भारतात हवेच्या प्रदूषणामुळे दगावणारे १२.४ लाख लोकांचे वय हे ७० वर्षांपेक्षा कमी होते. सार्वजनिक ठिकाणच्या हवेसाठी राष्ट्रीय पातळीवर ‘अॅम्बियंट एअर क्वालिटी’च्या ज्या मर्यादा ठरल्या आहेत, त्याहून जास्त प्रदूषित हवेत ७७ टक्के भारतीय नागरिकांना सतत वावरावे लागते. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये हवेच्या प्रदूषणामुळे उत्तर प्रदेशात सर्वाधिक नागरिक दगावले आहेत. हा आकडा २.६० लाख इतका आहे. त्याखालोखाल महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रात १.०८ लाख लोकांच्या प्रदुषणामुळे बळी गेला आहे. तर बिहारमध्ये ९६,९६७ लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक पातळीवर हवेच्या प्रदूषणामुळे होणारे मृत्यू आणि येणारे आजारपण यामध्ये भारताचा वाटा २६ टक्के इतका आहे. त्याचबरोबर अहावालात असेही म्हटले आहे की, भारतात जर इतकी हवा प्रदूषित झाली नसती तर लोकांचे आयुष्यमान सरासरी १.७ वर्षांनी वाढले असते.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई धुरकटली, आता लक्ष द्यावंच लागेल!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -