घरमुंबईशिवसेनेनं 'करून दाखवलं'! - मनसे

शिवसेनेनं ‘करून दाखवलं’! – मनसे

Subscribe

शिवसेनेने दादर चौपाटीच्या सुशोभिकरणाच्या झालेल्या कामाचं पुन्हा भूमिपूजन केल्यानंतर मनसेने परिसरात बॅनर लावून शिवसेनेची खिल्ली उडवली आहे!

एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातलं वैर जगजाहीर असतानाच दुसरीकडे मनसेनं मुंबईच्या दादरमध्ये थेट शिवसेनेचीच टॅगलाईन वापरून शिवसेनेनं ‘करून दाखववलं’, असं सांगणारे पोस्टर्स लावले आहेत. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या असल्या, तरी हे ‘करून दाखवलं’ कौतुकाने नसून उपहासाने आणि टीकेच्या सुरात म्हटलं आहे. आणि त्याला निमित्त झालं ते काही वर्षांपूर्वी दादर चौपाटीच्या सुशोभिकरणाचं शिवसेनेनं पुन्हा एकदा भूमिपूजन केल्याचं! बुधवारी संध्याकाळी शिवसेनेतर्फे हा भूमिपूजनाचा कार्यक्रम करण्यात आला. त्यामुळे मनसेने शिवसेनेची खिल्ली उडवणारे बॅनरच दादर परिसरात लावले आहेत.

मनसे म्हणतेय ‘आयत्या बिळावर वाघोबा’!

या बॅनरवर राज ठाकरेंनी जेव्हा या भागाच्या सुशोभिकरणाच्या कामाचं उद्घाटन केलं, तेव्हाचे फोटो आणि विविध वर्तमान पत्रांमध्ये छापून आलेल्या बातम्यांची कात्रणं लावण्यात आली आहेत. शिवाय सगळ्यात वर ‘आयत्या बिळावर वाघोबा’ असं ठळक अक्षरात लिहिण्यात आलं आहे. राज ठाकरेंच्या फोटोशेजारी ‘मनेसेने पूर्ण केलेल्या सुशोभिकरणाच्या कामाचं पुन्हा भूमिपूजन करून दाखवलं!’ असा टोला देखील हाणला आहे. त्यामुळे आता हे शिवसेनेला किती झोंबतंय, हे त्यांच्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतरच कळू शकेल.

- Advertisement -

वाचा काय झालं काल? – काम केलं मनसेनं, उद्घाटन करतेय शिवसेना!

राज ठाकरेंनीच केलं होतं उद्घाटन!

वास्तविक २०१२मध्येच या कामाच्या भूमिपूजनाचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. तेव्हा मनसे नेते नितीन सरदेसाई हे या भागातले आमदार होते. त्यांच्या निधीतून त्यांच्या कार्यकाळात हे काम २०१४मध्ये पूर्ण देखील झालं होतं. मात्र, नेमकं तेव्हाच महापौर बंगल्याच्या सुरक्षेचं कारण पुढे करत शिवसेनेनं या पूर्ण झालेल्या कामावर कुंपण घालून ती जागाच वापरायोग्य ठेवली नाही. आता पुन्हा एकदा त्या कामाचं भूमिपूजन करून शिवसेनेनं मनसेनं केलेल्या कामाचं श्रेय घेतल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -