घरमुंबईरंगपंचमीच्या दिवशी अंबरनाथमध्ये घडला लुटमारीचा प्रकार

रंगपंचमीच्या दिवशी अंबरनाथमध्ये घडला लुटमारीचा प्रकार

Subscribe

रंगपंचमीचा कार्यक्रम आटोपून जात असतांना ५  तरुणांना चाकूचा धाक दाखवून दोघांनी त्यांच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे तर दुसरा आरोपी फरार आहे.

रंगपंचमीचा कार्यक्रम आटोपून जात असतांना ५  तरुणांना चाकूचा धाक दाखवून दोघांनी त्यांच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे तर दुसरा आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. कल्याण- कर्जत या वर्दळीच्या महामार्गावर हा लुटमारीचा प्रकार घडला आहे.

कल्याण ( पूर्व ) येथील चिंचपाडा परिसरात राहणारे विकास मोरे , निखिल दोंदे , पंकज गायकवाड ,स्कंद लोंढे ,लोकेश नायडू हे ५ जण मोटारसायकल वरून गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास रंगपंचमीचा कार्यक्रम आटोपून घराकडे जात होते. हे सर्वजण कल्याण – कर्जत महामार्गावरील जांभूळ फाटा जवळ आले असता आरोपी अभिजित जितू पवार ( १९) आणि विशाल विलास पवार दोघेही राहणार वांद्रापाडा अंबरनाथ ( प ) यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांचे ३ मोबाईल आणि १८४० रुपये असा एकूण २० हजार ५४० रुपयांचा मद्देमाल घेऊन आरोपी फरार झाले .

- Advertisement -

या प्रकरणी अंबरनाथ पोलिसात आरोपी अभिजित पवार आणि विशाल पवार यांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला करून आरोपी अभिजित पवार याला अटक केली आहे तर आरोपी विशाल पवार हा अद्याप फरार आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घुगे यांना विचारले असता ते म्हणाले कि आरोपी अभिजित पवार याला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे . तो रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध चोरी आणि लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -