घरमुंबईभरलोकलमध्ये विकृत तरुणाकडून अश्लिल चाळे

भरलोकलमध्ये विकृत तरुणाकडून अश्लिल चाळे

Subscribe

सार्वजनिक ठिकाणी अश्लिल चाळे करून स्त्रीयांचा विनयभंग करणार्‍या मुंबईतील विकृत लोकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईत स्त्रीयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी अश्लिल चाळे करून स्त्रीयांचा विनयभंग करणार्‍या मुंबईतील विकृत लोकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईत स्त्रीयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही विकृत लोक आता गर्दीचीही पर्वा करेनाशी झाली आहेत. असाच एक प्रकार ऐनगर्दीच्या वेळी लोकल ट्रेनमध्ये घडला आहे. आजुबाजूला इतर प्रवासी असतानाही जाणूनबुझून एका तरुणीपुढे मोबाईलवर ब्लू फिल्म बघणार्‍या एका विकृताला प्रवाशांनी चांगलाच चोप दिला.

सुरत पंडीत असे या विकृत तरुणाचे नाव असून तो कांदीवलीला रहातो. सुतारकाम करणारा सुरत हा विरारहून निघालेल्या एका उपनगरीय लोकलमध्ये प्रवास करीत होता. भाईंदर रेल्वे स्थानक येताच तक्रारदार तरुणी या लोकलमध्ये चढली होती. तिला बोरिवलीला जायचे होते. गर्दी असल्याने ती एका बाजूला उभी असताना तिच्या बाजूला उभ्याअसलेल्या सुरजने तिला नकोसा स्पर्श केला. गर्दीमुळे तिने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. मात्र काही वेळाने सुरजने पुन्हा तिला अश्लील स्पर्श केला. सुरज जाणूनबाजून स्पर्श करीत असल्याचे लक्षात येताच ती बाजूला गेली.

- Advertisement -

त्यानंतर त्याने तिला दिसेल असा प्रकारे मोबाईलवरुन ब्ल्यू फिल्म पाहण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्या तरुणीने सुरजला चांगलेच हासडले आणि घडलेला प्रकार इतर प्रवाशांना सांगितला. प्रवाशांनी सुरजला चालत्या लोकलमध्येच जबरदस्त मारले. बोरिवली रेल्वे स्थानक येताच सुरजला तिथे उपस्थित रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. या तरुणीने घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगून सुरजविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -