घरमुंबईमुंबई सर्वात स्वच्छ राजधानी, शहरांमध्ये इंदौर अव्वल!

मुंबई सर्वात स्वच्छ राजधानी, शहरांमध्ये इंदौर अव्वल!

Subscribe

केंद्र सरकारच्या सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या सर्वेमध्ये मुंबईचा मागे पडली होती. त्यामुळे मुंबईकरांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र, आता देशातल्या सर्वात स्वच्छ राजधानींमध्ये मुंबईचा पहिला क्रमांक आला आहे.

केंद्र सरकारतर्फे देशभरात स्वच्छ शहरांचा सर्वे करण्यात आला होता. यामध्ये इंदौर शहराने बाजी मारली आहे. गेल्या वर्षीही इंदौर शहराने प्रथम क्रमांक पटकावला होता. सर्वात महत्वाचे म्हणजे गेल्या वर्षी इंदौर ४३० शहरांमध्ये प्रथम आले होते. यावर्षी ४२०३ शहरांमध्ये इंदौर शहर प्रथम आले आहे.

- Advertisement -

यासोबतच सर्वात स्वच्छ शहर मानल्या जाणाऱ्या या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मध्यप्रदेशचे भोपाल शहर आहे. तर तिसऱ्या स्थानी चंदिगडची वर्णी लागली आहे. गेल्या वर्षी चंदीगड ११व्या स्थानी होते. मागील वर्षाच्या सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातले ४४ शहरं हे स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल दर्जाची घोषित करण्यात आली होती. यावर्षीही महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक आला आहे.

बुधवारी दिल्लीच्या नॅशनल मीडिया सेंटरमध्ये केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप पुरी यांनी या सर्वेचे निष्कर्ष घोषित केले. या सर्वेमध्ये दिल्ली महापालिकेला सर्वात स्वच्छ महानगरपालिका तर सर्वात स्वच्छ राजधानी म्हणून मुंबईला घोषित करण्यात आले आहे. त्याचबरोबर विजयवाडा हे शहर दहा लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -