घरमुंबईजीएसटी भवन इमारतीला आग

जीएसटी भवन इमारतीला आग

Subscribe

आगीबद्दल व्यक्त होतोय संशय,आग लागलेला मजला अनधिकृत,अनेक ऑडिट रिपोर्ट जळून खाक

माझगावमध्ये जीएसटी भवनच्या इमारतीला मंगळवारी दुपारी मोठी आग लागली. आगीचं वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या होत्या. सुमारे तीन तासांनंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत ऑडिट रिपोर्ट आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. त्यामुळे या आगीबद्दल संशय व्यक्त केला जात असताना सर्व रिपोर्टचे संगणकीकरण करण्यात आले असून ते सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. आग लागलेला दहावा मजला अनधिकृत असल्याची चर्चा होती.

आग लागलेल्या इमारतीत जीएसटी कार्यालयाशिवाय सरकारच्या अन्य विभागाचीही कार्यालये आहेत. सुरुवातीला इमारतीच्या आठव्या मजल्यावर आग लागली. नंतर ती नवव्या, दहाव्या मजल्यापर्यंत गेली. दोन्ही मजल्यावरील कर्मचार्‍यांना तातडीने बाहेर काढण्यात आले आहे.

- Advertisement -

आगीमुळे सर्व्हर रूमचे कुठलेही नुकसान झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळताच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार पक्षाची बैठक सोडून तातडीनं घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दिलेल्या माहितीनुसार, ही आग ’लेव्हल फोर’ची होती. एका मजल्यावर लागलेली ही आग आता तीन मजल्यांपर्यंत पसरली होती. इमारतीवर धुराचे लोट दिसत होते.

जीव धोक्यात घालून राष्ट्रध्वज उतरवला
जीएसटी भवनाला लागलेल्या आगीत शिपाई कुणाल जाधव यांनी प्रसंगावधान राखत नवव्या मजल्यावर असलेला राष्ट्रध्वज सुरक्षित उतरवला. कुणाल जाधव हे गेल्या १६ वर्षांपासून जीएसटी भवनात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. ज्यावेळी ही आग लागली तेव्हा नवव्या मजल्यावर असलेल्या तिरंग्यापर्यंत ती पोहचली असती. हा धोका लक्षात घेऊन कुणाल जाधव यांनी तातडीने नवव्या मजल्यावर जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या देशाचा राष्ट्रध्वज आगीपासून वाचवला.

- Advertisement -

आगीच्या चौकशीचे आदेश-अजित पवार
राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जीएसटी भवनाच्या इमारतीमध्ये सुमारे साडेतीन हजार लोक काम करतात. मात्र, कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. आग नेमकी कशामुळं लागली, याची चौकशी करण्यात येईल, असे अजित पवार म्हणाले.

ती आग वेल्डींगच्या ठिणगीमुळेच?                                                                                माझगावमधील विक्रीकर भवन अर्थात आताचे वस्तू व सेवा कर (जीएसटी) भवनाच्या नवव्या मजल्यावर लागलेल्या आगीमुळे पुन्हा एकदा संशयाचा धुराने वातावरण ढवळून निघाले आहे. या इमारतीच्या दुुरुस्तीचे काम सध्या सुरु होते. या दुरुस्तीच्या कामांमध्ये वेल्डींगचे काम सुरु होते. या वेल्डींगच्या ठिणगीमुळेच ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. ही आग नवव्या मजलयावर उप विक्रीकर अधिकार्‍याचे दालन असून त्या दालनातच प्रथम आग लागली गेली असल्याचा प्रथम दर्शनी लोकांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -