घरमहा @४८२६ - मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ

२६ – मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ

Subscribe

असा आहे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ...

उत्तर मुंबई हा मतदारसंघ मुंबई शहरातल्या ६ मतदारसंघांपैकी एक. एक मेट्रोपोलिटन शहर म्हणून बहुभाषिकत्व, दाटीवाटीची वस्ती, अनेक धर्म-जातीच्या लोकांचं सहजीवन, मोठ्या प्रमाणावर नोकरदार वर्ग आणि छोट्या प्रमाणात चालणारे व्यवसाय अशी बाकी मुंबईत जी काही लक्षणं आढळतात, तशीच ती इथेही आढळतात. पण त्यातही दहिसर, मागाठणे, कांदिवली आणि चारकोप या भागांमध्ये मराठी भाषिकांचं प्रमाण जास्त आहे. यातला मागाठणे सोडला तर इतर तीन ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. तर मुस्लीम बहुल मालाडमधून काँग्रेसच्या तिकिटावर असलम शेख यांनी उमेदवारी मिळवली आहे. गेल्या ३० वर्षांत भाजपचाच वरचष्मा राहिलेल्या या मतदारसंघात २००४साली गोविंदा आणि २००९ साली संजय निरूपम यांच्या रुपानं काँग्रेसची खासदारकी दिसली होती. इथून सलग ५ वेळा खासदार म्हणून निवडून गेलेले आणि उत्तर प्रदेशचे विद्यमान राज्यपाल राम नाईक यांना गोविंदा आणि संजय निरुपम या दोघांनी हरवलं होतं. पण २०१४च्या मोदी लाटेमध्ये गोपाळ शेट्टींनी ४ लाखांहून अधिक मतांनी संजय निरुपमांचा पराभव करत ही जागा पुन्हा भाजपकडे वळवली.

मतदारसंघाचा क्रमांक – २६

- Advertisement -

नाव – मुंबई उत्तर

संबंधित जिल्हे – मुंबई उपनगर

- Advertisement -

प्रमुख उद्योग-व्यवसाय – लघुउद्योग, नोकरी

प्रमुख शेतीपीक – NA

शिक्षणाचा दर्जा – ९०.७८%

महिला – ८७.१९%

पुरुष – ९३.८५%


मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग

एकूण मतदार(२०१४) – ९ लाख ४५ हजार ६४२

महिला मतदार – ४ लाख १८ हजार ३९४

पुरुष मतदार – ५ लाख २७ हजार २४७


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

गोपाळ शेट्टी – भाजप – ७ लाख ६ हजार ६७८

ऊर्मिला मातोंडकर – काँग्रेस – २ लाख ४१ हजार ४३१

सुनिल उत्तमराव थोरात – वंचित बहुजन आघाडी – १५ हजार ६९१

नोटा – ११ हजार ९६६


विधानसभा मतदारसंघ – आमदार

१५२ – बोरीवली – विनोद तावडे, भाजप

१५३ – दहिसर – मनीषा चौधरी – भाजप

१५४ – मागाठणे – प्रकाश सुर्वे – शिवसेना

१६० – कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर – भाजप

१६१ – चारकोप – योगेश सागर – भाजप

१६२ – मालाड पश्चिम – असलम शेख – काँग्रेस


BJP MP Gopal Shetty
भाजप खासदार गोपाळ शेट्टी

विद्यमान खासदार – गोपाळ शेट्टी, भाजप

पोयसरमध्ये जन्म झालेल्या गोपाळ शेट्टींची त्यांची मातृभाषा तुलुसोबतच गुजराती, हिंदी, मराठी आणि इंग्रजीशी असलेली दोस्ती हा त्यांचा युएसपी आहे. यामुळे मुंबई उत्तर मतदारसंघातल्या बहुभाषिक मतदारवर्गाशी ते सहज जोडले जातात. राम नाईक यांच्या हाताखाली तयार झालेले गोपाळ शेट्टी १९९२ साली पहिल्यांदा मुंबई महानगर पालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे २००४मध्ये बोरीवली-दहिसर विधानसभा मतदारसंघातून ते तोपर्यंतच्या सर्वाधिक मताधिक्याने म्हणजे ५२ हजार ७०० मतांनी निवडून आले. २००८मध्ये मधू चव्हाण यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर गोपाळ शेट्टींची भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यातून केलेल्या कामाच्या जोरावर आणि मोदी लाटेचा तगडा पाठिंबा असल्यामुळे २०१४मध्ये शेट्टी या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.

 २०१४मधील आकडेवारी

गोपाळ शेट्टी – भाजप – ६ लाख ६४ हजार ००४

संजय निरूपम – काँग्रेस – २ लाख १७ हजार ४२२

सतीष जैन – आप – ३२ हजार ३६३

नोटा – ८ हजार ७५८

मतदानाची आकडेवारी – ५३.०७%

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -