वर्षावर भाजपाच्या उमेदवार निवडीचा घाट; मतदारांना झाला त्रास

वर्षा बंगल्यापासून ५०० मीटर अंतरावर तर सुरक्षेसाठी पोलिसांनी बॅरिकेटस लावले होते. मात्र या सर्वाचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होताना दिसला.

Mumbai
भाजपच्या बैठकीचा मतदारांना त्रास

लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडीसाठी आज सकाळपासूनच वर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाच्या आमदार-खासदराच्या बैठकांचा सपाट सुरू आहे. मात्र भाजपाच्या उमेदवार निवडीचा त्रास मात्र सर्वसामान्यांना झाला अशीच परिस्थिती आज पहायला मिळाली. त्याचे कारण म्हणजे आज दिवसभर वर्षावर बैठका असल्यामुळे वर्षा बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वर्षा बंगल्यापासून ५०० मीटर अंतरावर तर सुरक्षेसाठी पोलिसांनी बॅरिकेटस लावले होते. मात्र या सर्वाचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होताना दिसला.

पोलिसांनी रस्त्यांच्या मधोमध बॅरिकेट लावल्यामुळे मोठ्या गाड्या आल्या की, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता. दरम्यान, असाच अडथळा इथून जाणाऱ्या एका वृद्ध आजीला झाला. यावेळी वैतागलेल्या आजीने थेट पोलिसांना जाब विचारला. दरम्यान, या आजींचा रोष पाहून पोलिसांनी रस्त्याच्या मधोमध लावलेला बॅरिकेटस काढला. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पत्रकारांना देखील वर्षां या निवासस्थानापासून ५०० मीटर अंतरावर थांबावं लागले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here