सकाळी सकाळी पश्चिम रेल्वे खोळंबली; गोरेगाव येथे सिग्नलमध्ये बिघाड

Mumbai
Mumbai Western Railway problem
पश्चिम रेल्वे

मुंबईची मध्य रेल्वे नेहमीच काहीना काही बिघाडासाठी ओळखली जाते. त्या तुलनेत पश्चिम रेल्वे कधीतरी रखडते. मात्र आज बुधवारी (२२ मे) सकाळी सकाळीच पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव येथे सिग्नलमध्ये बिघाड झाल्यामुले रेल्वेला ब्रेक लागला. सध्या सिग्नलमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र रेल्वेसेवा अतिशय धीम्यागतीने सुरु आहे.

सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी गोरेगाव स्थानकानजीक रेल्वे सिग्नलमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे चर्चगेटच्या दिशने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. बोरीवलीपासूनच रेल्वेच्या एकापाठोपाठ रांगा लागल्या होत्या. दुरुस्तीनंतर रेल्वे आता सुरु झाली असली तरी वेळापत्रक मात्र कोलमडले आहे.