घरमुंबईकामगारांची घोर निराशा, बायोमेट्रिक सुरूच राहाणार

कामगारांची घोर निराशा, बायोमेट्रिक सुरूच राहाणार

Subscribe

निर्णय स्थगिती ऐवजी सवलतीवर प्रशासनाने केली बोळवण

महापालिका कर्मचाऱ्यांना येत्या सोमवारपासून बायोमेट्रिक हजेरी लागू करण्याच्या निर्णयावरून अखेर प्रशासन आणि कामागर संघटनांमध्ये चर्चा झाली असली तरी समाधानकार उत्तर मात्र प्रशासनाकडून मिळू शकलेले नाही. बायोमेट्रीक हजेरीचा निर्णय पूर्णपणे स्थगित करण्याची मागणी सर्व कामगार संघटनांची असताना प्रशासनाने यामध्ये केवळ सवलत देत त्यांची बोळवण केली आहे. त्यामुळे कामावर येण्यास जेवढा वेळ उशीर होईल तेवढाच वेळ भरुन देण्याची अट घालत प्रशासनाने ही सवलत देवू केली आहे. त्यामुळे कामगार संघटनांच्या चर्चेनंतरही कार्यालयांमध्ये शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक असून बायोमेट्रिक प्रणालीचा वापर केला जाणार असल्याचे पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे.

मंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थितीसह येत्या सोमवारी सहा जुलैपासून बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्याचे परिपत्रक सामान्य प्रशासनाने आयुक्तांच्या स्वाक्षरीने जारी केले होते. परंतु रेल्वे सेवा पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने कर्मचाऱ्यांना वेळेवर कामावर पोहोचणे शक्य नसल्याने बायोमेट्रिकची सक्ती तुर्तास न करता याला पावसाळ्यापर्यंत स्थगिती दिली जावी,अशी मागणी विविध कामगार संघटनांनी केली होती. याबाबत काही कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे चर्चा केली.

- Advertisement -

या बैठकीत “जे कर्मचारी मुंबईत दुरवरून कामावर येतात. ते एक ते दोन तास उशिरा आले तरी कोणतीही कारवाई केली जाणार नाही. तितका वेळ ड्युटी संपल्यानंतर भरून काढावा. मात्र जाणूनबुजून कामावर न आल्यास करवाई केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.” कंत्राटी व बहुउद्देशीय कामगारांनाही रोज ३०० रूपये भत्ता दिला जाईल, अशी माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनचे सुखदेव काशिद, महापालिका कार्यालयीन कामगार संघटनेचे Adv. प्रकाश देवदास व म्युनिसिपल इंजिनिअर युनियनचे साईनाथ राजाध्यक्ष यांनी दिली.


हेही वाचा – Corona Update: ठाण्यात दिवसभरात १ हजार ९२१ नव्या रुग्णांची नोंद, ३१ मृत्यू

- Advertisement -

वय वर्ष ५० पेक्षा अधिक असलेले कर्मचारी, अधिकारी, गरोदर महिला तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, डायलिसीस असे दीर्घ स्वरूपाचे आजार असलेले तसेच दिव्यांगांना केंद्र सरकारने ज्या सवलती दिल्या आहेत, त्या पालिका कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असून कामावर हजर राहण्यास सूट देण्यात आली आहे. सातवा वेतन आयोगाची थकबाकी, गटविमा, कंत्राटी कामगार, आरोग्य सेविका यांच्या प्रश्नांवर लवकरच बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, बायोमेट्रीक हजेरीला दि. म्युनिसिपल युनियनचा तीव्र विरोध असल्याचे युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी स्पष्ट केले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -