घरमुंबईगोरेगावचा नया नगर नाला अतिक्रमणमुक्त

गोरेगावचा नया नगर नाला अतिक्रमणमुक्त

Subscribe

महानगरपालिकेने नया नगर नाल्यावरील सुमारे ७० अनधिकृत बांधकाने तसेच अतिक्रमण हटवली.

‘पी दक्षिण’ विभागातील गोरेगाव पश्चिममधील नया नगर नाल्यावरील अतिक्रमणाचा विळखा दूर करण्यात आला आहे. महापालिकेने नाल्यावरील तब्बल ७० अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणे हटवली. मागील चार वर्षांपासून या अनधिकृत बांधकामांमुळे या नाल्याच्या रुंदीकरणाच काम रखडले होते. त्यामुळे पावसामुळे या भागात तुंबणार्‍या पाण्याचा निचरा होऊन नागरिकांना होणार्‍या त्रासातून सुटका होईल.

मोकळी जागा पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या ताब्यात

गोरेगाव पश्चिम परिसरातील नया नगर नाल्यालगतच्या सुमारे ७० अनधिकृत बांधकामांमुळे रुंदीकरणाचे काम रखडल्याने ही अतिक्रमणे पाडण्याचे काम महापालिकेच्या पी दक्षिण विभागाने हाती घेतली होती. ही सर्व बांधकामे पक्क्या स्वरुपाची होती. त्यामुळे बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस ही कारवाई हाती घेऊन ही सर्व बांधकामे तोडण्यात आली आहे. ही बांधकामे तोडल्यानंतर मोकळी जागा पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त देवीदास क्षीरसागर यांनी दिली आहे. या कारवाईसाठी महापालिकेच्या ५० कामगार, कर्मचारी तसेच अधिकारी यांच्यासह बांगूर नगर पोलीस ठाण्यातील ३० पोलीस कर्मचारी घटनास्थळी तैनात होते.

- Advertisement -

नया नगर नाल्याच्या रुंदीकरणाचा मार्ग आता मोकळा

या अनधिकृत बांधकामांमुळे गेली सुमारे ४ वर्ष रखडलेल्या नया नगर नाल्याच्या रुंदीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नया नगर नाल्याच्या रुंदीकरणामुळे बेस्ट नगर, नया नगर आदी लगतच्या परिसरांमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने होईल, असे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. तसेच या नाल्यालगत सुमारे ३ मीटर रुंदीचा रस्ता बांधण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अतिक्रमणे हटवल्यामुळे भविष्यात नालेसफाईची यंत्रसामुग्री सुलभतेने नाल्यालगत नेणे आणि नाल्याची साफसफाई करणे इत्यादी बाबी अधिक सुकर झाल्याचेही त्यांनी सांगितले.


हेही वाचा – ठाण्याचे खाडी किनारे सुशोभित करण्याच्या नावाखाली खारफूटीची कत्तल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -