घरमुंबईरक्ताची माहिती देण्यास रक्तपेढ्यांची टाळाटाळ

रक्ताची माहिती देण्यास रक्तपेढ्यांची टाळाटाळ

Subscribe

रक्ताची माहिती सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारने ‘ई-रक्तकोष’ हे ऑनलाईन पोर्टल सुरू केलं होतं. पण, वारंवार विनंती करूनही राज्यातील काही रक्तपेढ्या रक्ताची माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचं समोर आले आहे.

रक्ताची माहिती सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारने ‘ई-रक्तकोष’ हे ऑनलाईन पोर्टल सुरू केलं होतं. पण, वारंवार विनंती करूनही राज्यातील काही रक्तपेढ्या रक्ताची माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. याप्रकरणी आता ‘राज्य रक्त संक्रमण प्राधिकरण’ (एसबीटीसी) ने गंभीर दखल घेत राज्यातील सर्व खासगी आणि पालिका हॉस्पिटलमधील रक्तपेढ्यांना लेखी पत्र पाठवून रक्ताची माहिती द्या, असे आदेश दिले आहेत. अन्यथा संबंधित रक्तपेढ्यांवर कारवाई करू, असंही सांगितलं आहे.

राज्यात रक्ताचा तुटवडा

मुंबईसह राज्यभरात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासायला सुरूवात झाली आहे. उन्हाळ्यात रक्ताची टंचाई भासणं सर्वसाधारण आहे. कारण, नोव्हेंबरमध्ये अनेक सरकारी आणि खासगी रक्तपेढ्यात रुग्णांना आवश्यक रक्तगट उपलब्ध नसल्याने नातेवाईकांना रक्तासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

- Advertisement -

तज्ज्ञ डॉक्टरांच्या माहितीनुसार, सणासुदीच्या काळावधीत अनेक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी असल्याने कुटुंबिय बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन आखतात. या दरम्यान रक्तदान शिबिरांना ब्रेक लागतो. त्यामुळे, रक्ताची साठवणूक न झाल्यानं अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता दिसून येते. यंदाही दिवाळीत सुट्ट्या असल्याने शिबीर भरवण्यात न आल्यानं रक्त तुटवडा भासत आहे.

अन्यथा आम्ही कडक कारवाई करू

विशेषतः हॉस्पिटलमधील रक्तपेढ्यांमध्ये रक्त उपलब्ध नसल्यास नातेवाईकांना खासगी रक्तपेढ्यांकडून रक्त आणावं लागतं. यावेळी रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट लक्षात घेऊन, त्यांना आवश्यक त्या रक्तगट कोणत्या रक्तपेढीत उपलब्ध आहे याची माहिती मिळावी, यासाठी २०१६ मध्ये सरकारने ई-रक्त कोष हे ऑनलाईन पोर्टल सुरू केलं. जेणेकरून एका क्लिकवर सरकारी आणि खासगी रक्तपेढ्यांमधील उपलब्ध रक्ताची माहिती मिळेल. पण, अनेक रक्तपेढ्या या पोर्टलवर माहितीच उपलब्ध करून देत नसल्याचं समोर आलं आहे. हे लक्षात घेऊन आता एसबीटीसीने राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना लेखी पत्र पाठवून उपलब्ध साठ्याची माहिती द्या, अन्यथा आम्ही कडक कारवाई करू, अशा इशारा दिला आहे.

- Advertisement -

मुंबईत खासगी आणि सार्वजनिक रक्तपेढ्यांची एकूण संख्या ५८ आहे. तर महाराष्ट्रात एकूण ३३६ रक्तपेढ्या कार्यरत आहेत. या सर्व रक्तपेढ्यांना त्यांच्याकडे असलेल्या रक्ताचा साठा किती आहे, कोणत्या रक्तगटाचे किती रक्त उपलब्ध आहे याची माहिती ई-रक्त कोष या वेबसाईटवर देण्यास बंधनकारक केलं होतं. परंतु, मुंबई वगळता महाराष्ट्रातील काही रक्तपेढ्या रक्ताची माहिती देत असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी आता खासगी आणि सरकारी सर्व रक्तपेढ्यांना लेखी पत्र पाठवून रक्ताची नोंदणी करा, अन्यथा रक्तपेढ्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.  -डॉ. अरूण थोरात, राज्य रक्त संक्रमण प्राधिकरण’ (एसबीटीसी) चे सह-संचालक


हेही वाचा – राजभवनावर मोर्चा काढणारे आमदार बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -