घरमुंबईमुंबईसह पूर्व, पश्चिम उपनगरात पाऊस; अनेक भागात साचले पाणी

मुंबईसह पूर्व, पश्चिम उपनगरात पाऊस; अनेक भागात साचले पाणी

Subscribe

मध्य रात्रीपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली असून भागात पाणी साचले आहे.

मध्य रात्रीपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली आहे. रात्रीपासून पावसाचा जोर कायम असल्यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. नवी मुंबई, गोवंडी, मानखुर्द, चेंबूर, ठाणे, दादर, सायन, कुर्ला, माटुंगा, परळ अंधेरी, हिंदमाता आणि लालबागमध्ये मध्यरात्रीपासून संततधार सुरू आहे. तर अनेक भागात मुसळधार पावसामुळे सायनमाटुंगा या रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे दादर ते कुर्ला दरम्यानची वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे. तर मुसळधार पावसामुळे दादरच्या हिंदमाता आणि सायन परिसरात पाणीच पाणी झालं असून वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

- Advertisement -

 

मुंबई उपनगरात जोरदार पाऊस

मुंबई उपनगरात जोरदार पाऊस

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜುಲೈ 23, 2019

- Advertisement -

मुंबईसह इतर काही ठिकाणी अतिवृष्टी

सांताक्रूझमध्ये ५८ मिमी, तर कुलामध्ये १७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रात्रीपासून मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पोषक स्थितीमुळे सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तसेच पुढील चार दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. २४ आणि २५ जुलैला कोकण विभागातील मुंबईसह इतर काही ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातही पुढील चार दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -