घरमुंबईअवयव दान, श्रेष्ठ दान; ७० वर्षाच्या व्यक्तिचा आदर्श

अवयव दान, श्रेष्ठ दान; ७० वर्षाच्या व्यक्तिचा आदर्श

Subscribe

अंधेरी पश्चिम येथील चार बंगला येथे राहणाऱ्या ७० वर्षीय चंद्रकांत तारे यांनी अवयवदान करुन चौघांना जीवदान दिलं आहे. मुंबईच्या क्रिटिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १७ डिसेंबर रोजी अवयवदान पार पडलं

अवयव दान, श्रेष्ठ दान!! या ओळी प्रमाणे अंधेरी पश्चिम येथील चार बंगला येथे राहणाऱ्या ७० वर्षीय चंद्रकांत तारे यांनी अवयवदान करुन चौघांना जीवदान दिलं आहे. मुंबईच्या क्रिटिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १७ डिसेंबर रोजी अवयवदान पार पडलं. तारे याचं अवयवदान मुंबईतील ४६वं अवयवदान असून चंद्रकांत तारे यांचे चार अवयव दान करण्यात आले आहेत. १६ डिसेंबर या दिवशी अंधेरीमध्येच चंद्रकांत तारे यांचा दुर्दैवी अपघात झाला. त्यांना तात्काळ क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. पण, त्यांच्यावर उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केलं. पण, त्यांचे इतर अवयव कार्यरत असल्यामुळे त्यांची मुलगी आणि जावई यांनी मिळून अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, फुफ्फुस, यकृत, आणि दोन किडनी हे अवयव दान करण्यात आले. यामुळे चार जणांना नव्याने जीवदान मिळण्यास मदत झाली आहे. या व्यक्तीचं फुफ्फुस कोकिलाबेन धीरूभाई अंबानी, तर, यकृत ज्युपिटर आणि दोन्ही किडनी जसलोक हॉस्पिटलमधील रूग्णांना दान करण्यात आल्या. शिवाय, त्यांचं हृदय आणि त्वचा देखील दान करण्यात येणार होती. पण, त्यासाठी खूप उशीर झाल्यानं  हृदय आणि त्वचा दान करता आली नाही. तारे यांचे जावई मिहिर यांनी ही माहिती दिली.

याविषयी अधिक माहिती देताना क्रिटिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे समन्वयक समीर मोरे यांनी सांगितलं की, ” झेड टीसीसीच्या प्रोटोकॉलनुसार, चंद्रकांत मोरे यांचे अवयव ५० ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्तींनाच दान करण्यात आले आहेत. त्यांचे अवयव वेगवेगळ्या तीन हॉस्पिटलमध्ये दान केले आहेत. किडनी, लिव्हर आणि फुप्फुस हे अवयव दान करण्यात आले आहेत. ”

- Advertisement -

मुंबईत २३वं हृदय प्रत्यारोपण

मुंबईत २३वं यशस्वी हृदय प्रत्यारोपण करण्यात आलं आहे. मुंबईच्या फोर्टिस रूग्णालयात ही हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. विशाखापट्टणला राहणाऱ्या १७ वर्षीय तरूणाच्या अवयवदानाने मुंबईतील ५२ वर्षीय व्यक्तीला नव्याने जीवदान मिळण्यास मदत झाली आहे. फोर्टिस रूग्णालयातील कार्डियाक स्पेशालिस्ट डॉ. अन्वय मुळे आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. ही यंदाच्या वर्षातील २३वी यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होती.

तरूण ब्रेन डेड, केलं अवयव दान

विशाखापट्टणमध्ये राहणारा हा १७ वर्षीय तरूण इंजिनियरींगच्या पहिल्या वर्षाला शिकत होता. एका अपघातात त्याच्या डोक्याला मार लागला आणि तो ब्रेन डेड झाला. या तरूणाच्या कुटुंबियांचं अवयवदानासंदर्भात समुपदेशन केल्यानंतर त्यांनी अवयवदान करण्यास परवानगी दिली. त्यानुसार या मुलाचे हृदय, यकृत आणि दोन्ही किडनी हे अवयव दान करण्यात आले आहेत. हे मुंबईतील ४६वं अवयवदान होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -