घरमुंबईबाळासाहेब युतीचे श्रद्धास्थान- पंकजा मुंडे

बाळासाहेब युतीचे श्रद्धास्थान- पंकजा मुंडे

Subscribe

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले. ‘बाळासाहेब ठाकरे हे भाजप आणि शिवसेना युतीचे श्रद्धास्थान असून त्यांच्याकडून ऊर्जा मिळते. बाळासाहेबांच्या अनेक आठवणी आहेत. केवळ दोन पक्षांच्या नाहीतर दोन परिवारांच्या स्मृती आहेत’ असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘बाळासाहेब हे मुंडे-महाजन आणि ठाकरे कुटुंबातील आदरणीय असे ज्येष्ठ व्यक्तिमत्व होते. व्यक्तीगत पातळीवर आम्हा सर्व कुटुंबियांचे चांगले संबंध आहेत. बाळासाहेबांना आम्ही मिस करतोय. मात्र ते नसले तरी त्यांचे विचार आजही आम्हाला प्रेरणा देत आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर उद्धव ठाकरे आणि आमच्यातही कौटुंबिक जिव्हाळा कायम आहे. राजकारणापलिकडे आमचे नाते आहे’ असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काहीच दिवसांपूर्वी मराठवाडा दौर्‍यावर असताना बीडमधील गोपीनाथ गडावर भेट देऊन दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली होती.शिवसेनेसोबत संबंध ताणले गेले असताना भाजपकडून कोण नेता स्मृतिस्थळी भेट देणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. परंतु, देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे, विनोद तावडे यांनी उपस्थिती लावल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -