घरमुंबईमोदींच्या हस्ते होणार राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन

मोदींच्या हस्ते होणार राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन

Subscribe

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फिल्म डिव्हीजन परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या भारतीय चित्रपटांवर आधारित राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारी २०१९ रोजी मुंबई येथील फिल्म डिव्हीजन परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या भारतीय चित्रपटांवर आधारित राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. संग्रहालय सल्लागार समितीचे अध्यक्ष, प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक शाम बेनेगल आणि सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली फिल्म डिव्हीजनच्या परिसरात दोन इमारतींमध्ये हे संग्रहालय उभारण्यात आले आहे.

संग्रालय उभारणीसाठी १४० कोटी ६१ लाखांचा खर्च

संग्राहालय उभारणीसाठी १४० कोटी ६१ लाखांचा खर्च आला असून व्हिज्युअल्स, ग्राफिक्स, मल्टीमिडीया आणि इंटरॅक्टीव एक्सीबीट्स आदींचा समावेश असलेल्या या संग्रहालयाच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीचा गौरवशाली प्रवास मांडण्यात आला आहे. संग्रहालय दोन इमारतींमध्ये उभारण्यात आले असून नवीन संग्रहालय इमारत आणि १९ व्या शताकातील ऐतिहासिक गुल्शन महल येथे आहे. नवीन संग्रहालयात ‘गांधी आणि चित्रपट’, ‘मुलांचा चित्रपट स्टुडियो’, ‘तंत्रज्ञान, सर्जनशीलता व भारतीय चित्रपट’ आणि ‘भारतातील चित्रपट’ अशी दालन आहेत. गुल्शन महल ही भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वारसा इमारत असून ती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचाच भाग आहे. याठिकाणी 9 दालन असून याद्वारे भारतीय चित्रपटाचा शंभर वर्षांचा प्रवास दर्शविण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -