घरमुंबईमुदत वाढीनंतरही पॉलिटेक्निकला अल्प प्रतिसाद

मुदत वाढीनंतरही पॉलिटेक्निकला अल्प प्रतिसाद

Subscribe

मोठ्या प्रमाणात जागा शिल्लक राहण्याची शक्यता

पॉलिटेक्निकला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळावा यासाठी दहावीच्या निकालापूर्वीच तंत्र शिक्षण संचालनालयाकडून ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी सुरू केली होती. मात्र अर्ज नोंदणी प्रक्रियेस विद्यार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याने प्रवेश अर्ज भरण्यास 26 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र मुदतवाढीनंतरही पॉलिटेक्निकला विद्यार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळाला आहे. पॉलिटेक्निकच्या 1 लाख 11 हजार जागांसाठी 55 हजार 664 अर्ज आले आहेत. यातीलही 12 हजार 471 विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत एफसीपर्यंत नोंद केली नाही.

राज्यात तंत्रशिक्षणाचे महत्त्व कमी झाले असून शासकीय महाविद्यालयांतील जागाही यंदा भरणे अवघड झाले आहे. त्यामुळे बहुतांश तुकड्यांना टाळे लागण्याची शक्यता आहे. त्यातच काही संस्थानांनी यावर्षी पॉलिटेक्निकचे कॉलेज बंद करण्याबाबत एआयसीटीईकडे अर्ज केले आहेत. तसेच काही मोजक्याच अभ्यासक्रमांना विद्यार्थी गेल्या काही वर्षापासून पसंती देत आहेत त्यामुळे बहुतांश जागा रिक्त राहत आहेत. यावर्षी दहावीचा निकाल कमी लागला आहे. त्यामुळे अर्ज येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे यावर्षी शासकीय अनुदानित महाविद्यालयातीलच जागा शिल्लक राहण्याचे यंदा प्रमाण अधिक असण्याचीही शक्यता आहे. राज्यात एक लाखांहून अधिक जागा असूनही आतापर्यंत निम्याहूनही अर्ज दाखल झालेले नाहीत, अशी परिस्थिती आहे.

- Advertisement -

बुधवारपर्यंत अर्ज करणार्‍या 55 हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ 43 हजार विद्यार्थ्यांनी आपले अर्ज स्विकृती केंद्रात दाखल केले आहेत. पॉलिटेक्निकसाठी 1 लाख 11 हजार जागा असूनही या जागावर अर्ज कमी आले आहेत. या जागांसाठी राज्यातून 55 हजार 664 अर्ज दाखल झाले आहेत, त्यातील 43 हजार 193 विद्यार्थ्यांनी आपले अर्ज एफसी केंद्रावर निश्चित केले आहेत, तर त्यातील अजून 12 हजार 471 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असले तरी त्यांनी अर्ज निश्चिती केलेली नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जागा रिक्त राहण्याची चिंता वाढली आहे.

एकूण जागा – 1 लाख 11 हजार
एकूण अर्ज – 55,664
निश्चित केलेले अर्ज – 43,193
निश्चित न केलेले अर्ज – 12,471

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -